Varangaon : शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेची पिण्याच्या पाण्याची पाइप लाइन ही अंजनसोंडा पुलाखालून नेली असून ही पाइप लाइन काढण्यात यावी यासाठी नहींचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांनी नगरपरिषदेस नोटीस दिली आहे. टाकलेली पिण्याच्या पाण्याची पाइप लाइन काढल्यास शनिवार, १२ एप्रिल रोजी महामार्ग जाम करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद व प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांना माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला आहे.
‘नहीं’ ने दबंगगिरी करू नये शिवाय शहराला १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने वरणगावकर आधीच त्रस्त आहेत. ‘नहीं’ने दाबावापोटी पाइपलाइन काढू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे या वेळी करण्यात आली. शेतकरी त्यांच्या शेतातून पाइप-लाइन टाकू देत नाहीत व २०२१ ला नहींने याच पुलाखालून पाइप-लाइन टाकून दिली. मात्र आता नवीन योजनेची टाकलेली पाइप-लाइन कोणाच्या दबावातून काढण्यात येत आहे, याबाबत माहिती द्यावी, असेही काळे यांनी नहींच्या प्रकल्प संचालकांना ठणकावून सांगितले. मंत्री गडकरी व जलसंपदा मंत्री महाजन व मंत्री सावकारे यांना निवेदन देण्यात आले.
महामार्ग प्राधिकरणाने भूमिका न बदलल्यास आंदोलन निश्चित : सुनील काळे
नहींने भूमिका न बदलल्यास शनिवारी (१२ एप्रिल) महामार्ग रोको करण्यात येईल, असा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे, मिलिंद भैसे, नाना चौधरी, कृष्णा महाजन यांनी दिला आहे. नहींने भूमिका न बदलल्यास शनिवारी (१२ एप्रिल) महामार्गावर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे, मिलिंद भैसे, नाना चौधरी, कृष्णा महाजन यांनी दिला आहे