---Advertisement---

Toranmal Hill Station : तोरणमाळचा होणार विकास, पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी घेतली बैठक

by team
---Advertisement---

Toranmal Hill Station : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळचा विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी   प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करीत आहेत. पर्यटन दृष्ट्या तोरणमाळचा विकास झाल्यास स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध होऊन बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळचा विकासासाठी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत विधानपरिषद सदस्य आ.चंद्रकांत रघुवंशी,आ.आमश्या पाडवी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

तोरणमाळचा विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी निधी देखील मंजूर करण्यात येईल. पर्यटनाला अधिकाधिक वाव मिळावा यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळचा विकास झाल्यास आदिवासींचे स्थलांतर थांबून त्यांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.15 एप्रिल नंतर पर्यटन विभागाचे अधिकारी तोरणमाळला येणार असून, सर्वेक्षण करणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

गुजरात,मध्य प्रदेश राज्यसह नाशिक,पुणे, मुंबईतील पर्यटक देखील तोरणमाळला पर्यटनासाठी येत असतात.परंतु, आवश्यक त्या सोयीसुविधा नसल्याने पर्यटकांच्या हिरमोड होतो.तोरणमाळचा विकासासाठी विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमश्या पाडवी यांनी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे बैठक घेण्याची विनंती केली होती.त्यानुसार,मंगळवारी अधिकाऱ्यां समवेत बैठक झाली. बैठकीत तोरणमाळाचा विकासावर मंथन करण्यात आले. जिल्ह्यातून वाहणाऱ्या नर्मदा नदीवर पर्यटकांना विहारासाठी नवीन बोट उपलब्ध होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीला पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment