---Advertisement---

वनजमिनीसह ॲपे रिक्षातून ५८ लाखांचा गांजा जप्त, शिरपूर तालुका पोलिसांसह वनविभागाची कारवाई

by team
---Advertisement---

शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेपासून १०० मीटर अंतरावरील नियत क्षेत्र आंबा कक्ष क्रमांक ८३३ वरील गांजा शेतीतून शिरपूर तालुका पोलिसांसह वनविभागाने संयुक्त कारवाईत सुमारे ५७लाखांचा ओला हिरवट रंगाचा गांजा जप्त केला. ही कारवाई मंगळवार, ८ एप्रिल रोजी करण्यात आली. दरम्यान, दुसऱ्या कारवाईत शिरपूर तालुका पोलिसांनी ॲपे रिक्षातून दीड लाखाचा गांजा पकडत तिघांना अटक केली.

शिरपूर तालुका पोलिसांकडून दीड लाखाचा गांजा जप्त

पोलीस निरीक्षकपूर जयपतक्या हिरे पाना चिलारे येथून दहिवदकडे तीन संशयित ॲपेतून गांजा वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ वर कारखाना फाट्याच्या पुढे एचपी पेट्रोल पंपाजवळ दहिवद येथे सापळा लावत्यानंतर संशयित रूपेश गेमश्या भाग्वादे ऊर्फ भुगावाडे (गेरु घाटी, ता. वरला. जि. बडवानी, मध्य प्रदेश), अनिल गुजाऱ्या पावरा व कैलास कालुसिंग पावरा (दोन्ही रा.चिलारे) यांना ॲपेसह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. संशयितांकडून प्रत्येकी १० किलो याप्रमाणे एकूण ३० किलो गांजा जप्त करण्यात आला. कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार करीत आहेत. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

५७ लाखांचा गांजा जप्त

वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गस्तीदरम्यान नियत क्षेत्र आंबा कक्ष क्रमांक ८३३ मध्ये मका व ज्वारीच्या शेतातून संशयित बाहेर येताना दिसताच पथकाला पाहून ते मध्य प्रदेशच्या दिशेने पसार झाले. या वेळी यंत्रणेने छापेमारी करीत ५६ लाख ८५ हजार ७०० रुपये किमतीचा हिरवट, ओलसर गांजा जप्त केला. पळासनेर वनपाल बीपीन महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सुनील वसावे, मिलिंद पवार उदय पवार, हवालदार संतोष पाटील, हवालदार संदीप ठाकरे, हवालदार राजू ढिसले, हवालदार जाकीरोद्दीन शेख, हवालदार जगन्नाथ कोळी, हवालदार दिनेश सोनवणे, कॉन्स्टेबल जयेश मोरे, कॉन्स्टेबल मनोज नेरकर, कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर, कॉन्स्टेबल मुकेश पावरा, कॉन्स्टेबल ग्यानर्सिंग पावरा, चालक हवालदार अल्ताफबेग मिर्झा, चालक कॉन्स्टेबल इसरार फारुकी, तसेच वनविभागाचे धुळे उपवनसंरक्षक नितीन कुमारसिंग, शिरपूर सहायक वनसंरक्षक राहुल घरट. सांगवी वनपरिक्षेत्रीय अधिकारी काशिनाथ देवरे, पळासनेर वनपाल बिपीन महाजन व वनविभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनी केली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment