Godavari Technical College : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प प्रदर्शनामध्ये गोदावरी तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्ष विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावत महाविद्यालयाच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे.
अभाविप व सृजन तसेच रोजगार उद्योजकता व नाविन्यता विकास विभाग महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ, लोणेरे यांच्या संयुक्त विद्यमाने डिपेक्स २घ२५ हे राज्यस्तरीय प्रकल्प प्रदर्शन पुणे येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक ३ ते ६ एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये पार पडले.
प्रदर्शनात राज्यभरातून विद्यार्थ्यांचा सहभाग
या प्रदर्शनात राज्यभरातून विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांसह विविध विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी संशोधन केलेल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांना इंडस्ट्रीज सोबत जोडण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या संशोधनास वाव मिळण्यासाठी घेण्यात येते. या प्रदर्शनात राज्यभरातून विविध कंपन्यांचे प्रतिनिधी शासनाचे प्रतिनिधी तसेच संपूर्ण राज्यभरातील तंत्र शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा समावेश असतो.
सदर अधिवेशनात गोदावरी तंत्रनिकेतनचे तृतीय अभियांत्रिकीचे विद्यार्थी ग्रीष्मा पाटील, पुष्पक भालेराव, कल्पेश बनकर यांनी त्यांच्या एआय बेस्ड डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर या प्रकल्पाचे सादरीकरण केले व या स्पर्धेत घवघवीत यश मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण प्रसंगी डॉ. श्रीराम भोगले,सृजन ट्रस्ट अध्यक्ष, अभाविपचे राष्ट्रीय मंत्री डॉ. विरेंद्रसिंग सोळंकी, ए आय सी टी ई चे अध्यक्ष प्रा. टी. जे. सितारामन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रसिद्ध उद्योजक डॉ. धोका, अभाविपचे स्टेट जॉइंट सेक्रेटरी प्रा. अमित नेहेते, अभाविपच्या पुणे शहर अध्यक्ष प्रा. प्रगती ठाकूर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना त्यांच्या या प्रकल्पासाठी डिपेक्स समन्वयक प्रा. एन सी पाटील, तंत्रनिकेतन विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. चेतन विसपुते, प्रकल्प मार्गदर्शक प्रा. चंद्रकांत शिंपी, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे आदींचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले आहे.त्याचप्रमाणे गोदावरी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य) व डॉ. अनिकेत पाटील सर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक केल.