---Advertisement---

Nandurbar Crime News : घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस, 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

---Advertisement---

नंदुरबार : शहरातील विविध भागात झालेल्या दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 12 बोअरची बंदूकीसह एकुण 80 हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.

उपनगर पोलीस ठाणे हद्दितील फिर्यादी रोहिदास फकीरा पटले, रा. पोस्ट पळाशी, ता.जि. नंदुरबार यांचे राहते घराचे दरवाजाचे कडीकोयंडा तोडून त्यांचे संमतीशिवाय घरातुन 12 बोअरची बंदूक चोरुन नेले म्हणुन उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 89/2025 भा. न्या. संहिता कलम 305, 331(3), 331(4), 324(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दिनांक 09/04/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली .

त्यानुसार सदरचा गुन्हा एकता नगर परिसरात राहणारा सराईत आरोपी शरद चव्हाण व त्याचा मामेभाऊ सनी शिंदे अशांनी मिळून केले असल्याची खात्रीशीर बातमी मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला कारवाई कामी रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून इसम नामे शरद चव्हाण याचा एकता नगर परिसरात शोध सुरु असतांनाच तो मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव शरद ऊर्फ पवन अरुण चव्हाण, वय 23 वर्षे, रा. एकता नगर, नंदुरबार असे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन नमुद गुन्हयाबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचा मामेभाऊ सनी शिंदे याचे सोबत मिळुन केला असल्याची कबुली दिली. त्याअन्वये स्था.गु.शा. पथकाने सनी शिंदे याचा जयहिंद कॉलनी येथे जाऊन शोध घेतला असता तो मिळून आला त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सनी विजय शिंदे, वय- 19 वर्षे, रा.एकता नगर, ह. मु. जयहिंद कॉलनी, नंदुरबार यास देखील ताब्यात घेण्यात आले.

त्याअन्वये वर नमुद आरोपींकडुन एक 12 बोअरची बंदूक सह एकुण 80,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असुन त्यामध्ये उपनगर पोलीस ठाणे गुरनं. 89/2025 तसेच गु.र.नं. 105/2025 असे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, तसेच पोहेकॉ मुकेश तावडे, विशाल नागरे, बापू बागुल, पोना/मोहन ढमढेरे, विकास कापूरे, पोशि/शोएब शेख, अभय राजपुत, रामेश्वर चव्हाण, दिपक न्हावी अशांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment