---Advertisement---

Jalgaon Crime News : जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ, भरदिवसा पत्रकाराच्या घरावरच मारला डल्ला

by team
---Advertisement---

Jalgaon News : जळगाव शहरात चोरटयांनी धुमाकूळ घातला असून काल रात्री दोन महागळ्या कार चोरुन नेल्याची घटना ताजी असतानाच अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. या घटनेत चोरटयांनी चक्क पत्रकाराच्या घरावरच डल्ला मारला आहे. बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी सोन्यासह चांदीचे दागिने व रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील महाबळ रस्त्यावरील अरुंधती अपार्टमेंटमध्ये पब्लिक लाईव्ह पोर्टलचे संपादक काशिनाथ चव्हाण हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास चव्हाण आपल्या परिवारासह बाहेर गेले होते. हीच संधी साधून चोरटयांनी चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातून ७ ग्राम वजनाची सोन्याची चैन तर ५ भारचे चांदीचे ब्रासलेट व ८५ हजारांची रोकड लंपास केली.

यानंतर चव्हाण यांच्या पत्नी घरी आल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडलेला दिसताच. त्यांना चोरी झाल्याचे समजले त्यांनी लागलीच रामानंद नगर पोलीस ठाण्यात संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच रामानंद पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांच्यासह पोलीस पथक घटना घटनास्थळी दाखल झाले. या बाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment