---Advertisement---

जळगाव रेल्वे स्टेशनमधील प्रवासी सोयीसुविधांमध्ये पडणार भर

---Advertisement---

जळगाव : रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अखेर जळगाव स्टेशनचा बांधकाम आराखडा निश्चित झाला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत जळगाव रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास होणार असून यात जुन्या रेल्वे स्थानकाची मुख्य इमारत पाडून तेथे नव्याने तीन मजली इमारत, स्थानकाबाहेरील बाजूस प्रवेशद्वार तसेच स्टेशनमधील प्रवासी सोयीसुविधांमध्ये भर पडणार आहे. याशिवाय जुन्या रेल्वेच्या बोगीला आकर्षक सजावटीत रूपांतरित करून प्रवाशांसह अन्य नागरिकांसाठी रेल्वे रिफ्रेशमेंट कोच रेस्टॉरंट तयार करण्यात येणार आहे.

रेल्वे प्रशासनाने अलीकडेच जुन्या रेल्वे बोगीत रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी एक नवीन आकर्षक पॉइंट तयार करण्याची योजना सुरू केली आहे. यात जुन्या रेल्वे बोगीचे रूपांतर करून त्यात रेस्टॉरंट उभारून प्रवाशांसाठी उत्तम सुविधा देण्याचा पर्याय रेल्वे विभागाकडून दिला जात आहे. त्यानुसार जळगाव स्टेशनमध्ये रेल्वे विभागाकडून रेल्वे रिफ्रेशमेंट कोच रेस्टॉरंटसाठी मंजुरी मिळाली असल्याची माहिती वाणिज्य प्रशासनाने दिली.

सरकत्या जिन्याजवळच कोच रेस्टॉरेंट

जळगाव रेल्वे स्थानकाचा समावेश अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत असल्याने नवीन इमारत बांधण्याचे काम लवकरच करण्यात येणार असून त्यात रिफ्रेशमेंट रेस्टॉरंट सुविधेची भर पडणार आहे. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील सरकत्या जिन्याजवळ रेल्वे रिफ्रेशमेंट कोच रेस्टॉरंट 25 बाय 6 मीटर जागेवर जुन्या रेल्वे बोग्यांचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. जळगाव रेल्वे स्थानकांतर्गत सहा फलाट असून 1 आणि 2 क्रमांकाचे फलाट 1 व 2 526 मीटर, 3 आणि 4 क्रमांकाचे फलाट 623 मीटर, तर 5 व 6 क्रमांकाचे फलाट 558 मीटर अशा लांबीचे आहेत.

नवीन प्रवेशद्वार सुटसुटीत व आकर्षक होणार

जळगाव रेल्वे स्थानकाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मुख्य प्रवेशद्वार असून जुन्या इमारतीसह पार्सल कार्यालयाच्या जागेवर नवीन स्थानक इमारत उभारणी केली जाणार आहे. नव्याने उभारणी होणाऱ्या स्थानकांतर्गत रेल्वे प्रवाशांना दोन्ही बाजूला नवीन सर्वसाधारण तसेच आरक्षित तिकीट घर, तसेच व्हीआयपी प्रतीक्षागृह, दोन मोठ्या प्रतीक्षागृहांची उभारणी करण्यात येणार असल्याचे प्रशासन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment