---Advertisement---

Raver : आयपीएलचा हंगाम,मॅचवर सट्टा घेणाऱ्या तिघांवर कारवाई, रावेर पोलिसांत गुन्हा दाखल

by team
---Advertisement---

IPL Betting in Raver : शहरात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यात पोलीसांनी सुमारे एक लाख बाविस हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला आहे .या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सध्या आयपीएल क्रिकेटचे सीजन सुरू असून शहरातील काहीजण आयपीएल क्रिकेटच्या मॅचवर सट्टा घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल यशवंत विशाल जयस्वाल यांना मिळाली. माहितीच्या आधारावर त्यांनी पथकास कारवाई करण्याची सूचना दिली.

यानुसार पोलिस पथकाने शनिवारी सायंकाळी ५. ३० छापा टाकला असता रावेर शहरातील रामचंद्रनगर भागात एका घराच्या आडोशाला दोन इसम त्याचेजवळील स्लीपबुकवर काहीतरी लिहतांना दिसले व त्यांचे जवळ अवती भवती काहीइसम उभे असल्याचे पोलीस पथकास दिसले. पथकाने इसमांवर छापा टाकला असता उभे असलेले इसम गल्ली बोळाचा फायदा घेवुन पळुन गेले.पोलिसांनी जुगाराचा खेळ घेणारे हिरामण दगडु चौधरी ,आकाश हिरामण चौधरी यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून पांढऱ्या रंगाचे जुगाराचे बुक व काही मोबाईल असा एकूण १,०१,५०० रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला आहे.

पोलीसांनी दुसरी कारवाई रावेर शहरातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गावर अमनखाँ मनसुरखॉ (रा. उटखेडा रोड फतेहनगर रावेर) याच्यावर केली. त्याच्याकडून पांढऱ्या रंगाचे जुगाराचे बुक व मोबाईल असा एकुण ११,००० रुपये किमतींचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. रावेर पोलिसांनी दोन आयपीएल मॅचवर सट्टा घेणाऱ्या इसमांवर कार्यवाही करुन एकुन १,२२,५०० रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबत रावेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम १२ (अ) प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

यांनी केली कारवाई


सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी , अप्पर पोलीस अधिक्षक जळगांवअशोक नखाते , उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, गुन्हे शोध पथकातील पो.ना. कल्पेश आमोदकर, पो.शि. प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, महेश मोगरे, विकार शेख, विशाल पाटील, सचिन घुगे, सुकेश तडवी यांनी केली. पुढील तपास पो. ना. कल्पेश आमोदकर हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment