---Advertisement---

दुर्दैवी! आंघोळीसाठी नदीपात्रात गेले अन् परतलेच नाही, नेमकं काय घडलं?

---Advertisement---

यावल : तालुक्यातील अंजाळे येथे सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजेदरम्यान आंघोळ व कपडे धुण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या तिघांचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यात दोन महिला व एका पाच वर्षीय बालकाचा समावेश आहे.

वैशाली सतीश भिल (वय २८), त्यांचा मुलगा नकुल सतीश भिल (वय ५ वर्ष, रा. अंतुर्ली, ता. अमळनेर) आणि सपना गोपाल सोनवणे (वय २७, रा.पळाशी, ता. सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे मृत तिघांचे नाव असून, या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ घाणेकर नगर असून, येथे गोंधळाच्या कार्यक्रमाकरिता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पळाशी येथून व अंमळनेर तालुक्यातील अंतुर्ली गावातून दोन महिला आल्या होत्या. या महिला सोमवारी तापी नदीच्या पात्रात कपडे आणि अंघोळ करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, तापी नदीत असलेल्या एका डोहात पाय घसरून दोन महिला आणि एका बालकाचा बुडून मृत्यू झाला.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, एकाच ठिकाणी तिघांचा असा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली होत आहे.

यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख, हवालदार अर्षद गवळी, इस्तीयाक सय्यद, अनिल पाटील, उमेश महाजन घटनास्थळी दाखल झाले. तिघांचे मृतदेह तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह रात्री आठ वाजता त्यांच्या कुटुंबाला सोपवण्यात आले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment