---Advertisement---

India’s First Onboard ATM: प्रवाशांनो लक्ष द्या! आता धावत्या रेल्वेतूनही काढता येणार पैसे, पंचवटी एक्स्प्रेसमध्ये देशातील पहिली ऑनबोर्ड एटीएम सेवा

by team
---Advertisement---

India’s First Onboard ATM: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवासादरम्यान आता प्रवाशांना एटीएम सुविधा मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल संधींचा शोध घेण्यासाठी एक उपक्रम सुरू करत आहे. रेल्वे प्रवास अधिक आधुनिक आणि सुलभ करण्याचा याद्वारे प्रयत्न आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने महाराष्ट्र बँकेच्या समन्वयाने धावत्या गाडीत देशातील पहिली ऑनबोर्ड एटीएम सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी चाचण्या सुरू केल्या आहेत.

गैर-भाडे महसूल ग्राहक संवाद बैठकीत काह दिवसांपूर्वी पार पडली होती. या बैठकीत गाड्यांमध्ये एटीएम बसवण्याचा विचार पुढे आला होता आणि यात रेल्वेच्या भुसावळ विभागाने हा नाविन्यपूर्ण विचार मांडला होता. या दूरदृष्टीपूर्ण कल्पनेला प्रतिसाद देत, प्रमुख राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने “नवीन, नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल कल्पना योजना” (NINFRIS)अंतर्गत औपचारिक प्रस्ताव सादर केला.

त्यानुसार, या प्रकल्पाची चाचणी सुरु करण्यात आली असून सध्या गाडी क्रमांक 12110 मनमाड–मुंबई सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेसमध्ये ही सेवा देण्यात येत आहे. या चाचणीतून या सेवेच्या व्यवहार्यता व कार्यक्षमतेची तपासली जाणार आहे. दररोज मनमाड ते मुंबई सीएसएमटीदरम्यान धावणाऱ्या या गाडीच्या डब्यांची संख्या 22 आहे. तर आसन क्षमता 2,032 असून दररोज सुमारे 2,200 प्रवासी मुंबई सीएसएमटीकडे प्रवास करतात. संपूर्ण गाडी वेस्टिब्यूल कनेक्टेड असल्यामुळे सर्व श्रेणीतील प्रवाशांना या एटीएमचा सहज लाभ घेता येणार आहे. या सेवे अंतर्गत एटीएम कोचमधील पूर्वी न वापरलेल्या जागेत बसवण्यात येत आहे.

ही ऑनबोर्ड एटीएम सेवा प्रत्यक्षात अंमलात आल्यावर, प्रवाशांना प्रवासादरम्यान सहज आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. विशेषतः ही एटीएम सेवा मोबाईल नेटवर्कद्वारे सतत जोडलेली राहणार असल्याने रिअल टाईम व्यवहार शक्य होतील. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडे या उपक्रमाचे नेतृत्त्व असून लवकरच इतर महत्त्वाच्या गाड्यांमध्येही ही सुविधा देण्याच्या शक्यतेचा विचार केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment