Jalgaon : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या महागाई विरोधात आज ( 16 एप्रिल रोजी) राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर्फे आकाशवाणी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर प्रति बॅरल 65.41 डॉलर आले आहेत यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये किमती प्रति बॅरल 63.40 डॉलर होती या कसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरणातून मिळणारे उत्पन्न ऐतिहासिक पातळीवर पोहोचलेले आहे.रेटिंग एजन्सी नुसार सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रति लिटर 15 ते 16 आणि डिझेलवर प्रति लिटर 6.12 रुपये नफा कमवत आहेत असे असूनही तेल कंपन्यांनी गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेल किमती कमी केलेल्या नाहीत सरकार पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढवून जनतेचे पैसे लुटत आहेत असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. आंदोलनावेळी वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या.
सदर आंदोलन युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व शहर जिल्हाध्यक्ष रिकू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनात प्रमुख उपस्थिती मा.रा.कॉं.पा.महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी,संग्रामसिंह सुर्यवंशी,सुनील माळी,अशोक पाटील,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण,राजू मोरे,किरण राजपूत,आकाश हिवाळे,चेतन पवार,नामदेव वाघ,साहिल पटेल, रफीक पटेल,डॉ.राहुल उदासी,योगेश साळी,रहीम तडवी,संजय चव्हाण,मयूर पाटील,आबिद खान,अरबाज पटेल आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Jalgaon News : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या महागाई विरोधात NCP शरद पवार गटातर्फे रस्ता रोको
