---Advertisement---

आता सदस्यांना हटविता येणार नगराध्यक्षांना पदावरून

---Advertisement---

मुंबई : राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार सदस्यांना देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या तरतुदींस मान्यता देऊन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

यापूर्वी नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेत निवडून आलेल्या सदस्यापैकी ५० टक्के सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जात असे. त्यानंतर अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची कार्यवाही केली जात असे.

आरती सुब्रमण्यम टीसीएसच्या पहिल्या महिला सीओओ

बंगळुरू : देशातील सर्वांत मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसच्या (टीसीएस) मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (सीओओ) जबाबदारी पहिल्यांदाच एका महिलेला देण्यात येणार आहे.

आरती सुब्रमण्यम येत्या १ मेपासून हे पद स्वीकारतील. आयटी कंपनीत एका महिलेला इतके मोठे पद देण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतातील आयटी क्षेत्रात खूप कमी महिला उच्च पदावर पोहोचल्या आहेत.

आरती सुब्रमण्यम यांनी १९८९ मध्ये टीसीएसमध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि आपल्या कठोर परिश्रमाने त्या सर्वोच्च स्थानावर पोहोचल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment