लग्नाच्या काही तास आधी एक वधू मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली. मेकअप पूर्ण होताच, ती तिच्या प्रियकराने बाहेर पार्क केलेल्या बाईकवर बसून पळून गेली. मुलीच्या कुटुंबीयांनी वराला सांगितले की, वधू ब्युटी पार्लरमधून परतत असताना एका रस्ते अपघातात मरण पावली. हे ऐकताच वर बेशुद्ध पडला.
मंडप सजला होता, शहनाईचे सूर वाजत होते, मंगल गीतही सुरु होती, वधूचे कुटुंब लग्नाच्या मिरवणुकीच्या स्वागताची तयारी करण्यात व्यस्त होते आणि दुसरीकडे वर देखील पगडी सजवून लग्नाची मिरवणूक काढण्याची तयारी करत होता. त्यानंतर मुलीच्या कुटुंबाकडून आलेल्या फोनमुळे वराला धक्का बसला. त्याची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध पडला. कुटुंबातील सदस्यांनी कसा तरी त्याला सांभाळले. त्याला सांगण्यात आले की वधू ब्युटी पार्लरमधून परतत असताना अपघातात मरण पावली. पण काही तासांनंतर समोर आलेल्या सत्याने सर्वांनाच धक्का बसला. वधू म्रु पावली नसून ती ब्युटी पार्लरमधून पूर्णपणे सजली आणि तिच्या प्रियकरासोबत बाईकवर बसून पळून गेली.
हा एखादा रोमँटिक कॉमेडी चित्रपट नसून एक वास्तव आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील दौराळा पोलीस स्टेशन परिसरात हा प्रकार घडला आहे. लग्नाची मिरवणूक सोमवारी संध्याकाळी येणार होती. मुलीचे लग्न रोहता परिसरातील एका तरुणाशी निश्चित झाले होते. लग्नाच्या काही तास आधी वधू तिचा मेकअप करण्यासाठी दारोला येथील एका ब्युटी पार्लरमध्ये गेली होती आणि मेकअप पूर्ण होताच, वधू तिच्या प्रियकराने बाहेर पार्क केलेल्या बाईकवर बसवून पळून गेली.
वधूच्या कुटुंबाने दिले अपघाताचे कारण
जेव्हा वधूच्या कुटुंबाला कळले की मुलगी पळून गेली आहे, तेव्हा सर्वांना धक्का बसला. मुलीचा गावात आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यात आला, पण कोणताही सुगावा लागला नाही. कुटुंबाने वराच्या कुटुंबाला खोटे सांगितले की वधूचा पार्लरमधून परतत असताना रस्ता अपघातात तिचा मृत्यू झाला. हे ऐकताच लगेचच वराची शुद्ध हरपली आणि तो खाली पडला. लग्नाऐवजी आता परिस्थिती शोकसभेसारखी झाली. पण जेव्हा वराच्या बाजूचे काही सदस्य सत्य जाणून घेण्यासाठी मुलीच्या घरी पोहोचले तेव्हा खरी कहाणी बाहेर आली.
पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली
वधूच्या वडिलांनी दौराळा पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. तक्रारीत लिहिले आहे की, ‘मी मेरठमधील दौराळा पोलीस स्टेशन येथील पाबरसा गावचा रहिवासी आहे. माझी मुलगी १४ एप्रिल रोजी लग्नासाठी दौराळा येथील ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. तिथून ती पहाटे ३ वाजताच्या सुमारास बागपत जिल्ह्यातील रहिवासी असलेला एक तरुण आणि त्याच्या साथीदारासह दुचाकीवरून पळून गेली. या दोन्ही व्यक्तींना दारू आणि ड्रग्जचे व्यसन आहे. माझ्या मुलीसोबत काहीतरी अनुचित घडेल अशी भीती मला वाटते. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा आणि वधूचा शोध घेणं सुरू केला आहे.
पोलीस घेत आहेत वधूचा शोध
दौराळा पोलिस ठाण्याचे म्हणणे आहे की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि मुलगी आणि दोन तरुणांचा शोध सुरू आहे. त्यांनी सांगितले की, मुलीच्या मृत्यूबद्दल मुलाकडच्यांना खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती , परंतु जर असे घडले असेल तर त्याचीही चौकशी केली जाईल.