---Advertisement---

Airport  Jobs 2025 :  भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरती, 1.40 लाखांपर्यंत पगार, ‘या’ तारखेपासून करू शकता अर्ज

---Advertisement---

Airport  Jobs 2025 : सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यां उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे.एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) ने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज मागवले आहेत. भरतीची सविस्तर सूचना देखील जारी करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवार २४ मे २०२५ पर्यंत अर्ज भरू शकतात.

रिक्त पदांची माहिती

एकूण पदे – ३०९
अनारक्षित प्रवर्गासाठी – १२५ पदे
ईडब्ल्यूएससाठी – ३० पदे
ओबीसी (एनसीएल) साठी – ७२ पदे
एससीसाठी – ५५ पदे
एसटीसाठी – २७ पदे

पात्रता

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बीएससी / बीटेक / बीई / बीएससी (भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २७ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

पगार

या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना गट ब ई-१ स्तराखाली ४०००० ते १.४० लाखांपर्यंत वेतन दिले जाईल. यासोबतच, उमेदवाराला डीए, सीपीएफसह वेतन भत्ते देखील दिले जातील.

अर्ज फी

या भरती मोहिमेसाठी उमेदवारांना अर्ज फी भरावी लागेल. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज फी १००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, महिला आणि अप्रेंटिसशिप केलेले उमेदवार मोफत अर्ज करू शकतात.

असा करा अर्ज

सर्वप्रथम, एएआयच्या अधिकृत www.aai.aero वेबसाइटवर जा आणि करिअर विभागात उपलब्ध असलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा

नंतर आवश्यक माहिती भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

शेवटी अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करा.

फॉर्मची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका.

भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment