---Advertisement---

चिमुरडीचा जीव घेणार ‘तो’ नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि: श्वास

---Advertisement---

डांभुर्णी ता.यावल : येथील शिवारात काल (१७ एप्रिल) रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारात बिबट्याने हल्ला करून रत्ना सतीश रुपनेर (वय २ ) या चिमुकलीला ठार केले होते. या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले असून, परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि: श्वास सोडला आहे.

यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात प्रभाकर चौधरी यांच्या शेतात ठेलारी (धनगर) समाजाचे मेंढपाळ कुटुंब काही दिवसांपासून वास्तव्यास होते. काल (१७ एप्रिल) रोजी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारात दोन वर्षीय चिमुकली आपल्या आईजवळ गाढ झोपलेली असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून ‘रत्ना’ या निष्पाप बालिकेचा जीव घेतला होता. दरम्यान, या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारात यश आले असल्याचे वनधिकारी विपुल पाटील यांनी दै. तरुण भारतशी बोलताना दिली.

नेमकी घटना काय ?

यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात प्रभाकर चौधरी यांच्या शेतात ठेलारी (धनगर) समाजाचे मेंढपाळ कुटुंब काही दिवसांपासून वास्तव्यास होते. काल (१७ एप्रिल) रोजी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारात दोन वर्षीय चिमुकली आपल्या आईजवळ गाढ झोपलेली असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून या निष्पाप बालिकेचा जीव घेतला होता. दरम्यान, घटना रात्रीच्यावेळी घडल्याने मयत चिमुकलीच्या कुटुंब व नातेवाईकांना काय करावं? हे सुचत नव्हते. पूर्ण बाग पालथा घालुनही मुलगी आढळून न आल्याने याबाबत वनविभाग यावल पश्चिमला माहिती देण्यात आली.

आरफीओ सुनील भिलावे यांच्या नेतृत्वात वन क्षेत्रपाल विपुल पाटील हे सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर गस्त घालून चिमुकलीचा शोध घेतला असता सकाळी सात वाजता ४०० मिटर अंतरावर तिचे शव छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. या वेळी ही दुर्घटना मनाला हेलकवणारी होती, घटनेचे गांभीर्य व नागरिकांची भीती, संताप व नरभक्षक मोकाट असलेला बिबट्या या सर्व बाबींची जाणीव वनविभागला अनेक दिवसांपासून होती. त्यामुळे बिबट्याच्या या सर्व हालचालीवर वन विभाग लक्ष ठेऊन होता.

आमदार चंद्रकांत सोनवणे यांची घटनास्थळी भेट

आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तहसीलदार मोहन्माला नाझीरकर यांच्यासह या घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून मोकाट असलेल्या बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली. जळगावचे जमीर शेक, सुनील भिलावे, विपुल पाटील, समाधान पाटील, स्वप्निल पाठोडे यांच्यासह पथक यांनी तातडीने तीन पिंजरे लावले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता नरभक्षक बिबट्याची ड्रोन द्वारे संपूर्ण हालचाली वर लक्ष ठेऊन त्याला रात्री आठ वाजेच्या सुमारात बेशुद्ध पाडून कुठलाही वेळ न घेता पिंजऱ्यात जे्रबंद केले.

दोन किलिंग केलेला नरभक्षक बिबट्यामुळे वन खात्याचे नाकेनवू आलेले काम आज अनेक प्रयत्नातून यशस्वी झाले आहे. हा बिबट्या पाच ते सहा वर्षाचा असल्याचा अंदाज आहे. जे्रबंद झालेला बिबट्या हा बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला यावल येथे पिंजऱ्यातून नेण्यात आले असून, त्याला नागपूर येथील गोरेगाव येथे पोहचविले जाणार असल्याची माहिती विपुल पाटील यांनी दै. तरुण भारतशी बोलत दिली.

शेतकऱ्यांनी सोडला मोकळा श्वास

जे्रबंद बिबट्याला पाहून शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या मनातील भीती कमी होऊन परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास सोडला आहे. मात्र त्यासाठी दोन वर्षाच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला असल्याची खंत सर्वांना असून, तिच्या कुटुंबातील तीची पोकळी ही नभरून निघणारी आहे. तरी प्रशासनाने या विषयाकडे लक्ष ठेऊन योग्य मार्गदर्शन व कागदोपत्री माहिती घेत तिच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयन्त करावा अशी माहिती सोनवणे यांनी वनविभागाला दिली असून तशी मागणी ग्रामस्थ मंडळी कडून केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment