---Advertisement---

Crime News : अवघ्या काही दिवसांत फुलणार होतं संसाराच्या वेलीवर फुल! पतीने असं केलं की, वाचून अंगावर उभा राहील काटा

---Advertisement---

Madhurawada Murder News : विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असतो. विवाहनंतर प्रत्येकाला प्रतीक्षा असते ती म्हणजे होणाऱ्या बाळाची. संसाराच्या वेलीवर जेव्हा अपत्य रुपी फुल उमलत त्याचा आनंद काही औरच असतो. या आनंदाच्या क्षणाची प्रतीक्षा प्रत्येक दाम्पत्य करतो. मात्र आंध्र प्रदेशात एक अशी घटना घडली आहे जी वाचून तुमच्या अंगार काटा उभा राहील. एका क्रूर पतीने आपल्या गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. क्रूर अशा या प्रकारामुळे गर्भवती मातेचा मृत्यू तर झाल्यास पण त्यांच्या संसाराच्या वेलीवर उमलणार फुल जगात येण्याआधीच कोमजले.

आंध्र प्रदेशातील मधुरावाडा येथे ही घटना घडली असून, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलीस सूत्रानुसार, ज्ञानेश्वर आणि अनुषा यांचे १० डिसेंबर २०२२ रोजी स्वतः इच्छेने लग्न झाले होते. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांतच दोघांत वाद सुरु झाले आणि त्यांच्यात सतत वाद व्हायचे. या वादातून आरोपी ज्ञानेश्वर याने गर्भवती पत्नी अनुषा हिचा गळा दाबून खून केला.

अनुषाच्या कुटुंबीयांनी केला हा आरोप

अनुषाच्या कुटुंबाचा आरोप आहे की, ज्ञानेश्वरने तिला याआधीही सोडण्याचा प्रयत्न केला होता. अनुषा गर्भवती राहिल्यानंतर, ज्ञानेश्वर तिला फसवत होता. अनुषाची डिलिव्हरीची तारीख जवळ आली होती. सोमवारी तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. त्याआधीच ज्ञानेश्वरने अनुषाच्या नातेवाईकांना आणि मित्रांना फोन केला. त्याने सांगितले की, अनुषा बेशुद्ध पडली आहे. तिला तात्काळ अरिलोवा येथील रुग्णालयात नेण्यात आले मात्र, डॉक्टरांनी अनुषाला मृत घोषित केले.

आरोपी पतीने गुन्हा केला कबूल

दरम्यान, अनुषाच्या कुटुंबियांना ज्ञानेश्वरच्या कृतीबद्दल संशय आला. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. चौकशीदरम्यान, ज्ञानेश्वरने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, त्याने अनुषाशी झालेल्या वादानंतर तिचा गळा दाबून खून केला. त्याने सांगितले की, अनुषाला ज्ञानेश्वरचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या संशयातून ती त्याला वारंवार त्रास देत होती.

पोलिसांनी ज्ञानेश्वरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. दरम्यान, या घटनेवर विजागमधील अनेक महिला संघटना आणि अनुषाच्या कुटुंबीयांनी ज्ञानेश्वरला कठोर शिक्षा देण्याची मागणी केलीय.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment