---Advertisement---

भाजीपाला, दूध खरेदी-विक्री जिल्हाभरात आज, उद्या बंद, सातबारा कोरा करण्यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे एल्गार

---Advertisement---

विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करू, असे आश्वासन दिले होते. सत्ता स्थापन होऊनही महायुती सरकारने अद्याप आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे राज्यात शनिवारी (१९ एप्रिल) आणि रविवारी (२० एप्रिल) भाजीपाला आणि दूध खरेदी-विक्री बंद ठेवण्याचा इशारा महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

विधानसभा २०२४ च्या वेळी महायुतीने शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करू, असे आश्वासन दिले होतेः परंतु अद्याप त्या आश्वासनाची पूर्तता झालेली दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांनी राज्यात १९ व २० एप्रिलला भाजीपाला व दूध खरेदी विक्री बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. बंदमध्ये भाजीपाल्याचे अडत दुकानदार, किरकोळ विक्रेते, दूध डेअरीचे चालक-मालक व शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग असून, बंद यशस्वितेसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राज्यभर मोहीम राबवीत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना ई-मेलद्वारे निवेदनपत्र पाठविण्यात आले आहे. निवेदनानुसार शनिवारी (१९ एप्रिल) व रविवारी (२० एप्रिल) राज्यभरात दूध व भाजीपाला बंद ठेवण्याचे मुद्दे असून, विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करू, शेतक-यांचे कर्ज माफ करू, असे आश्वस्त केले होते. मात्र, असे होताना दिसत नाही. संघटनेच्या माध्यमातून शासनाने कर्जमाफी करावी यासाठी मोहीम राबविली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील शेतकरी, दूध डेअरीचालक, भाजीपाला उत्पादक शेतकरी, व्यापारी १९ व २० एप्रिलला खरेदी-विक्री करणार नसल्याचेही नमूद केले आहे. तत्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment