Dhule Crime : वाहनाचा कट लागत्यानंतर जाब विचारल्याच्या वादात न शहरातील १७वर्षीय अल्पवयीन तरुणाला जमिनीवर आपटल्याने त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरुवारी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदी रोडवर घडली. फैज अहमद हुसेन अन्सारी (१७, धुळे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दोन संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाहनाचा कट लागत्याचे निमित्त
फैज हा शहरात मेडिकल दुकानात कामाला होता व कुटुंबाला हातभार लावत होता. बुधवारी रात्री उशिरा तो दुचाकीवरून घराकडे येत असताना अज्ञात वाहन समोर आल्याने त्याचा कट लागला व त्यावरून झालेल्या वादानंतर संशयितानी शिविगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. दोघे एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर फैजचे डोके सुमारे ५ ते ६ वेळा आपटले. फैजला अत्यवस्थ स्थितीत हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मोहंमद साजीद अब्दुल अन्सारी यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव रोड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक एस. टी. घुसर करीत आहेत.