---Advertisement---

Water shortage: राज्यात पाणीटंचाईच्या झळा ! धरणसाठा आला ३८ टक्क्यांवर

---Advertisement---

Water shortage : राज्यातील धरणसाठा आता ३८.९५ टक्क्यांवर आलाय. पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, विदर्भातील सर्व मोठ्या धरणांचा पाणीसाठा आता झपाट्याने खाली घसरलाय. एकीकडे तापमानाच्या झळा आणि दुसरीकडे पाणीटंचाई अशा दुहेरी कात्रीत राज्यातील बहुतांश भागातील नागरिक सापडले आहेत.

अकोल्यात पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावले जात आहेत. मराठवाड्यात १०-१२ दिवसांनी एकदा नळाला पाणी येतानाचे चित्र पुन्हा सुरू झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याच्या नियोजनावरून नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. राज्यभरात पाणीटंचाईचा प्रश्न चांगलाच पेटला आहे.

महाराष्ट्राच्या सहा महसूल विभागांपैकी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन विभागातील धरणांमध्ये आता ४० टक्क्यांहूनही कमी पाणी शिल्लक आहे. पुणे विभागात राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काही टक्क्यांनी पाणीसाठा अधिक असला तरी काही प्रमुख धरणे एप्रिलमध्यावरच मायनसच्या दिशेने वाटचाल करू लागली आहेत. त्यामुळे शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी याच सुमारास पाणीसाठा ३३.६२ टक्के एवढा होता. तो यंदा ३८.९५ टक्के एवढाच राहिला आहे.

सर्वात कमी जलसाठा पुणे विभागात

राज्यात पुणे विभागातील लघु मध्यम आणि मोठ्या एकूण ७२० धरणांमध्ये आता केवळ ३२.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला धरण ५१.१२ टक्क्यांवर भरले असून त्यात सध्या २८.५८ दलघमी उपयुक्त पाण्यासाठी आहे. पानशेत धरणात ३४.१० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सांगलीतील वारणा धरण ४०.५६ टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे. साताऱ्यातील कोयना ३७.२२ टक्क्यांवर आहे. तर सोलापूरमधील उजनी धरण आता शून्यावर पोहोचले आहे. कोल्हापुरातील दूधगंगा २६.४८ टक्क्यांवर असून राधानगरी धरण ५४ टक्क्यांवर आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---