---Advertisement---

बाभुळगाव तालुक्यात लागला तीन हजार वर्षांपूर्वीच्या वस्तीचा शोध, लोहयुगकालीन मडक्यांचे तुकडे, विहिरी व गोलाकार घरांचे आढळले अवशेष

---Advertisement---

यवतमाळ जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यातील पाचखेड येथे तीन हजार वर्षांपूर्वीच्या लोहयुगकालीन वस्तीचा शोध लावण्यात नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाला यश आले आहे. या उत्खननात पाचखेड येथे भगवान गौतम बुद्ध, सम्म्राट अशोक कालीन मडक्याचे तुकडे आढळून आले तसेच सातवाहन काळातील सहा विहिरी आढळल्या आहेत. सोबतच लोखंडी अवजारे, चुली व गोलाकार घरांचे अवशेष आढळून आले आहेत.

संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रभास साहू व नागपूर विद्यापीठ सहसंचालक प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात हे उत्खनन सुरू आहे. २०२५ मधील उत्खननात तीन हजार वर्षांपूर्वीच्या काळातील लोकवस्तीच्या घरांचे पुरावे मिळाले आहेत.

या उत्खनन स्थळाला सासू-सुनेचे उखाडे आणि बरड या नावाने ओळखल्या जाते. ही पांढऱ्या मातीची असणारी टेकडी सद्या स्मशानभूमी म्हणून उपयोगात आणली जात आहे. पाचखेड येथे मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये सुद्धा उत्खनन झाले होते. त्यावेळी देखील मानवी वस्तीचे काही अवशेष सापडले होते. यावर्षी पाचखेड येथील उत्खननाचे हे सलग दुसरे वर्ष आहे.

प्रा. डॉ. प्रभास साहू, प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात प्रा. डॉ. मोहन पारधी, डॉ. एकता धारकर, भदंत आनंद आणि ढोकणे यांचा उत्खनन चमूमध्ये समावेश आहेत. पाचखेड उत्खननास यवतमाळचे पुरातत्त्व संशोधक गोपीचंद कांबळे, श्रीमती नानकीबाई वाधवाणी महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सिद्धार्थ जाधव, भारतीय बौद्ध महासभा यवतमाळ जिल्हा प्रमुख मोहन भवरे, सरचिटणीस रूपेश वानखडे, गोपाळ लोणारे, प्रज्ज्वल कांबळे, संबोधी जाधव, सम्राट कांबळे यांनी भेट दिली..

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment