---Advertisement---

Jalgaon News : सेरेब्रल पारसी आजाराने ग्रस्त असलेल्या दोन बालकांचा मृत्यू, कुटुंबियांचे डॉक्टरांवर गंभीर आरोप

---Advertisement---

जळगाव : ‘सेरेब्रल पारसी’ आजाराने ग्रस्त असलेल्या दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.

जळगाव शहरातील जावळे हॉस्पिटलमध्ये सेरेब्रल पारसी आजारावर उपचारासाठी आलेल्या अडीच वर्ष आणि तीन वर्षीय बालकांना butox नावाचे इंजेक्शन देण्यात आले होते. इंजेक्शन दिल्यानंतर काही तासांनी दोघा बालकांची प्रकृती गंभीर झाली. यात एकाचा १८ एप्रिल रोजी तर दुसऱ्या तीन वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान २० एप्रिल रोजी मृत्यू झाला. दरम्यान, एका बालकाच्या मृत्यूबाबत पोलिस अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली असून डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे.

तर कारवाईला सामोरे जाऊ – डॉ. हर्षल जावळे

डॉ. हर्षल जावळे यांनी सांगितले की, दोन्ही बालकांचा मृत्यूचे कारण पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर कळू शकेल. या प्रकरणात आम्ही हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले तर जी कारवाई होईल त्या कारवाईला सामोरे जाऊ. दोघे बालकांना एकाच प्रकारचे butox नावाचे इंजेक्शन देण्यात आले होते. तसेच ज्या इंजेक्शनमुळे हा प्रकार घडला, त्या कंपनीला रिपोर्ट देत कळविण्यात आले असून, राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी ते वितरीत झाले आहे, त्यांचा वापर थांबविण्यात तसेच त्याची तपासणी होईल असेही ते म्हणाले.

तर कारवाई करू – पोलीस उपअधीक्षक संदीप गावित

बालकांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बालकाच्या पालकांनी केलेल्या आरोपानुसार योग्य तो तपास करून कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पोलीस उपअधीक्षक संदीप गावित दिली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment