---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात १० मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत

---Advertisement---

जळगाव : वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांमध्ये जलदगतीने तोडगा काढण्यासाठी तसेच साम ान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशभरात राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात येते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार १० मे २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात येणार आहे.

या लोकअदालतीमध्ये नागरी वाद, मोटार अपघात प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मजुरी दावे, दिवाणी प्रकरणे, न्यायालयीन प्रक्रियेत असलेले थकबाकीचे प्रकरणे तसेच इतर तडजोडीयोग्य प्रकरणे सोडविण्यात येणार आहेत. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी आणि प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी नागरिकांनी आपल्या प्रकरणांचा राष्ट्रीय लोकअदालतीत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.

या लोकअदालतीत प्रकरणे सोडवण्यासाठी तडजोडीला म हत्त्व देण्यात आले असून ज्या पक्षकारांना तडजोडीने प्रकरणे निकाली काढायचे असतील अशा संबधित पक्षकार व त्यांचे विधीज्ञ यांनी १० मे रोजी उपस्थित राहुन तडजोडीने आपआपले खटले निकाली काढावेत. तसेच ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांना सुध्दा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यांत आलेली आहे. या संधीचा पक्षकारांनी फायदा घ्यावा व १० मे रोजीच्या राष्ट्रीय लोक अदालतीत जास्तीत जास्त खटले सामोपचाराने निकाली करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगावतर्फे करण्यात आलेले आहे

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment