---Advertisement---
Jalgaon News: काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र निषेध नोंदवण्यात येत आहे, तर दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने कठोर पावले उचलत पाकिस्तानला घेरलं आहे. या कारवाईत भारताने सिंधू करार स्थगित कारण्यासह भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून देश सोडण्याचे आदेश दिले आहे. अश्यात जळगावमध्ये काही पाकिस्तानी निर्वासित कुटुंब वास्तव्यास आहे. भारत सरकारच्या या कठोर पावलांनी पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यास भाग पडले आहे. अश्यात जळगावात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी आपली व्यथा मांडली आहे.
व्हिसा रद्द आणि भारत सोडण्याच्या आदेशाने पाकिस्तनातील ही निर्वासित मंडळी व्यथित झाली असून आम्हाला परत पाठवू नये अशी विनंती करत आहे . या पाकिस्तानातील नागरिकांनी आपली व्यथा मांडत पाकिस्तानातील अत्याचार आणि असुरक्षिततेला कंटाळूनच आम्ही भारतात आलो आहोत, आम्हाला परत पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारतीय नागरिकत्व द्यावं अशी विनंती जळगावमध्ये जळगावमध्ये दीर्घकालीन व्हिसावर राहणाऱ्या अनेक पाकिस्तानी नागरिकांनी केली आहे. ही विनंती करत असतांना त्यांनी पाकिस्तानचा खरा चेहरा देखील समोर आणत पाकिस्थानात गैर मुस्लिमांवर प्रचंड अत्याचार होतो असे सांगितले.
एकाने सांगितले की, “तिथे आम्हाला सायंकाळी ५ वाजे नंतर दुकान बंद करून भीतीने घरात बसावे लागायचे.” यासह पाकिस्तानची आर्थिकस्थिती बिकट असून त्या ठिकाणी मूलभूत सुविधा देखील मिळत नाही. पाकिस्तानात महिला आणि मुली अजिबात सुरक्षित नसून त्यांना उचलून नेले जाते. अश्या भयावह परिस्थिती आम्ही जगत होतो. या सर्व अत्याचाराला कंटाळूनच आम्ही भारतात आलोय. त्यामुळे पाकिस्तानच्या त्या नरकात आम्हाला पुन्हा जायचे नाही. भारताने आमची समस्या लक्षात घेत आम्हाला व आमच्या नातेवाईकांना भारताचे नागरिकत्व द्यावं अशी विनंती केली आहे.
---Advertisement---