Erandol News: एरंडोल येथे आज (२८ एप्रिल) रोजी कश्मीर पहलगाम येथे हिंदू बांधवांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन व शहर बंद ठेवण्यात आलेले होते. या मोर्चाची सुरुवात सकाळी दहा वाजता पांडव वाडा येथून करण्यात आली. मोर्चात पाकिस्तानी झेंडा असलेली मानवी प्रतिकृती, व अतिरेक्या ची सजीव आरास होती. विशेषतः मेन रोडवर ठिकठिकाणी पाकिस्तानी कागदी ध्वज रोडवर चिटकवलेले होते व त्यावरून संपूर्ण वावर सुरू होता. जन आक्रोश मोर्चामध्ये सुरुवातीला रिक्षा वर लाऊड स्पीकर द्वारे पाकिस्तान निषेधार्थ घोषणा बाजी करत भ्याड हल्ल्याचा निषेध देखील करण्यात आला.
पुरुषांसह महिलांचा मोठा सहभाग
मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात पुरुष व महिलांचाही सहभाग पाहावयास मिळाला. मोर्चा प्रांत अधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर त्याचे छोटेखाणी सभेमध्ये रूपांतर झाले. यावेळी जगदीश ठाकुर, देविदास महाजन,विजय महाजन, दशरथ महाजन, जगदीश पाटील, यांनी दहशतवादी हल्ला हा कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध भावनांद्वारे शासकीय कार्यालयामार्फत पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्यात आला. नंतर हल्ल्यात मृत झालेल्या नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
असा होता मोर्चाचा मार्ग
या मोर्चाची सुरुवात सकाळी दहा वाजता पांडव वाडा येथून करण्यात आली. मोर्चा राम मंदिर, भोई गल्ली, भगवा चौक, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बुधवार दरवाजा, मरी माता मंदिर, म्हसावद नाका मार्गे प्रांत कार्यालया पर्यंत यानंतर प्रांत अधिकारी कार्यालयाच्या बाहेर पाकिस्तानी मानवी प्रतिकृती असलेल्या ध्वजाचे सार्वजनिक रित्या दहन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
मोर्चाच्या आयोजनात सकल हिंदू समाज प्रसाद दंडवते, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, दशरथ महाजन, राजेंद्र चौधरी,शालिग्राम गायकवाड, गोरख चौधरी, जगदीश ठाकुर, विजय महाजन, रमेश महाजन, डॉक्टर एन डी पाटील, रवींद्र दौलत पाटील, अतुल महाजन, अनिल महाजन, अमोल जाधव, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, शोभा साळी , रश्मी दंडवते, सोनल तिवारी निशा विंचुरकर, नयना पाटील, अर्चना तिवारी प्राजक्ता काळे, दर्शना तिवारी, बबीता क्षत्रिय, क्षमा साळी यांची प्रमुख उपस्थिती होती. मोर्चा आयोजनात नंदू चौधरी, भोला पवार ,दिगंबर बोरसे हिम्मत महाजन, नितीन बोरसे, नितेश चौधरी, करण पाटील, सिद्धेश वाघ संतोष महाजन, पवन साळी यांनी परिश्रम घेतले.
शहर बंदला उस्फुर्त प्रतिसाद
शहरातील सर्व व्यापारी संकुल काटेकोरपणे बंद होती. औषधी,दवाखाने, सरकारी कार्यालय, बँक शाळा, महाविद्यालय, वगळता सर्वच आस्थापने बंद होती. विशेष म्हणजे ऑनलाईन काम करणारी यंत्रणा , झेरॉक्स,शीतपेये ही सर्व बंद होती. आजच्या शहर बंद मुळे ग्रामीण भागातून शासकीय, बाजार, वस्तूंची खरेदी या कामानिमित्त शहरात येणाऱ्या बहुसंख्य लोकांना मनस्ताप देखील सहन करावा लागला. ऑनलाइन ची सर्व कामे जसे , आधार कार्ड, रेशन कार्ड , शासकीय योजनांचे फॉर्म भरणारे सर्व संबंधित ऑनलाइन कामे न करता त्यांना माघारी परत यावे लागले. सर्वच आस्थापने बंद असल्यामुळे बस स्टॅन्ड वर देखील शांतता होती. शहरातील मेन रोड, फुले आंबेडकर मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, येथील आस्थापने देखील पूर्णपणे बंद होते.