नंदुरबार : चावी बनविण्याच्या बहाण्याने दागिने चोरून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नंदुरबार तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक लाख 5 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. Nandurbar Crime News
आष्टे येथील फिर्यादी भास्कर श्रावण आंधळे यांच्या कपाटाची चावी बनविणाऱ्या इसमाने कपाटातुन सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असताना 24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा एकता नगर परिसरात राहणारा सराईत आरोपी नामे सुतारसिंग शिकलीकर याने केला आहे. तो सध्या सुरत शहरात उधना येथे फिरत असुन पुढे कोठेतरी पळून जाण्याची शक्यता आहे, बाबत खात्रीशीर बातमी मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला कारवाई करणेकामी सुचना केल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून इसम नामे सुतारसिंग शिकलीकर याचा सुरत शहरातील उधना येथील प्रभु नगर परिसरात शोध घेत असतांना तो पथकास मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुतारसिंग जलसिंग शिकलीकर, वय- 32 वर्षे, रा. एकता नगर, नंदुरबार असे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन नमुद गुन्हयाबाबत विचारपूस करता त्याने सदरचा केला असल्याची कबुली दिली आहे.
त्याअन्वये वर नमुद आरोपीकडुन एकुण 1,05,000/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन तालुका पोलीस ठाणे गुरनं. 102/2025 हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सदर ताब्यातील आरोपीला तालुका पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, तसेच पोहेकॉ मुकेश तावडे, बापु बागुल, विशाल नागरे, पोशि/अभय राजपुत, शोएब शेख, रामेश्वर चव्हाण अशांनी केली आहे.