जळगाव : एक लाखाचा टप्पा गाठणाऱ्या सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी, अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधी सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी खरेदी करीत असतात. परिणामी दर वाढल्याने दागिने खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात. चला जाऊन घेऊ कोणत्या शहरात काय आहेत सोन्याचे दर.
जळगावच्या सुवर्णपेठेत सोमवारी (२८ एप्रिल) सोन्याचा भाव ९०० रुपये प्रति तोळ्याने घसरला. मंगळवारी सकाळच्या सत्रात जळगाव सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,७०० (जीएसटीसह ९८५७१) रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. चांदीचा दर स्थिर दिसून आला असून सध्या चांदीचा एक किलोचा भाव विनाजीएसटी ९८००० रुपये इतका आहे.
सकाळी ६.२० वाजता एमसीएक्सवर सोन्याचा भाव ९६,०६० रुपये प्रति १० ग्रॅम होता. म्हणजेच त्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,०६८ रुपयांनी वाढली आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, एमसीएक्सवर चांदीची किंमत १४६ रुपयांनी वाढली आहे.
इंडियन बुलियन असोसिएशनच्या मते, २४ कॅरेट सोने ९६,३२० रुपयांवर आहे. २२ कॅरेट सोन्याची प्रति १० ग्रॅम किंमत ८८,२९३ रुपये आहे. तर, चांदी प्रति किलो ९७,०९० रुपयांवर आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९५,९८० रुपये तर चांदीचा दर प्रति किलो ९६,७५० रुपये आहे. दुसरीकडे, एमसीएक्सवर दिल्लीत सोन्याचा नवीन दर ९६,०६० रुपये आणि चांदीचा (९९९) ९६,५८७ रुपये आहे.
मुंबईत सोन्याच्या दराने सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९६,१५० रुपये आणि चांदी ९६,९१० रुपये प्रति किलो दराने आहे. दुसरीकडे, एमसीएक्सवर सोने प्रति १० ग्रॅम ९६,०६० रुपये आणि चांदी ९६,५८७ रुपये प्रति किलोने आहे.
चेन्नईमध्ये सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९६,४३० रुपये तर चांदीचा दर प्रति किलो ९७,२०० रुपये आहे. तर एमसीएक्सवर सोने प्रति १० ग्रॅम ९६,०६० रुपये आणि चांदी ९६,५८७ रुपये प्रति किलोने आहे.
बेंगळुरूबद्दल बोलायचे झाले तर, येथे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९६,२२० रुपये आणि चांदीचा दर प्रति किलो ९६,९९० रुपये आहे. तर एमसीएक्सवर सोने ९६,०६० रुपये आणि चांदी ९६,५८७ रुपये प्रति किलोने विकली जात आहे.