---Advertisement---

नागरिकांनो सावधान! सोशल मीडियावर ‘ट्रॅफिक पोलीस’ नावाने फिरणारी फाइल ठरू शकते धोकादायक

---Advertisement---

जळगाव : सध्या सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअॅप ग्रुप्सम ध्ये ‘ट्रॅफिक पोलीस’ नावाने फाइल मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. ती डाउनलोड करताच युजरचे व्हॉट्सअॅप हॅक होण्याची शक्यता निम णि होते, तसेच वापरकर्त्याचा महत्त्वाचा वैयक्तिक डेटा लिक होण्याचा धोका आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. या प्रकाराबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या स्वरूपातील अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसून, थेट फाइल स्वरूपात पाठवले जात आहे. अशा थेट पाठविलेल्या अॅप्समध्ये मालवेअर अथवा स्पायवेअर असण्याची शक्यता अधिक असल्याचे तंत्रज्ञान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही अॅप हे डाउनलोड करायचे असतील, तर ते संबंधित वेबसाइटवरूनच करावे. फसवणुकीनंतर १९३० या क्रमांकावर संपर्क साधवा, असेही पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

कोणताही सरकारी विभाग थेट फाइलद्वारे माहिती देत नाही. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या प्रकारांपासून दूर राहून सायबर सुरक्षेसंदर्भातील सजगता बाळगणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात अधिक माहिती अथवा तक्रार करण्यासाठी नागरिकांनी नजीकच्या सायबर पोलीस ठाण्याशी किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, धावा. असे आवाहनही पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी केले आहे.

अशी घ्या काळजी…

अनोळखी व्यक्तीकडून आलेली कोणतीही फाइल डाउनलोड करू नका. नावाने आलेल्या कोणत्याही अॅपवर विश्वास ठेवू नका. अशा संशयास्पद फाइल्स लगेच डिलिट करा आणि संबंधित ग्रुप अॅडमिनला सूचित करा. शक्य असल्यास फोन स्कॅन करून अँटिव्हायरस वापरा.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment