तळोदा : रस्ता क्रॉसिंग करून गेलेल्या विद्युत तारांना बायलरचा स्पर्श होऊन ट्रॉला चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अंकलेश्वर -बऱ्हाणपूर महामार्गावर आश्रवा (गुजरात) गावाजवळ घडली. रणजीत जगनाथ पाल (रा. सोनवा पोष्ट माधवगंज ता.सदन जि. प्रतापगड उत्तरप्रदेश) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
गुजरात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. ३ मे रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान टाटा सिग्ना ट्रेलर (क्र. सी.जी.०४ एम.एन.९४२४) ट्रॉला वर एक अवजड बॉयलर घेवून पंजाब हून येत होता. हा ट्राला अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरून गुजरातकडे जात असताना गुजराथ राज्याच्या आश्रावा गावा जवळ रस्ता क्रॉसिंग करून गेलेल्या ११ के .व्ही.च्या इलेक्ट्रिक तारांना बॉयलरला स्पर्श झाला.
यात ड्रायव्हर रणजीत जगनाथ पाल (रा. सोनवा पोष्ट माधवगंज ता.सदन जि. प्रतापगड उत्तरप्रदेश) याने गाडी थांबवून कॅबीनच्या दरवाजा उघडून बाहेर पडण्याच्या प्रयत्न करीत असताना वीजे धक्का लागून मृत्यु झाला. या घटनेमुळे अंकलेश्वर बऱ्हाणपूर- महामार्गावर रस्ता क्रॉसिंग करून कमी उंची विघूत तारांचा प्रश्न उभा राहीला आहे. घटनेचा पुढील तपास कुकरममुंडा (गुजरात) पोलीस करत आहेत.