Weather Update : उन्हाळ्याच्या तीव्र झळा प्रचंड जाणवत असून, दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे उष्णतेची जणू परीक्षाच देण्यासारखे आहे. अशात वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कारण हवामान विभागाकडून जळगावसह (Jalgaon weather update) अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा (unseasonal rain alert) देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजपासून आगामी काही दिवस जळगाव, (Jalgaon weather update) नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यंदा मार्च, एप्रिल हे दोन महिने नागरिकांना प्रचंड उष्णतेचे गेले. मागच्या काही दिवपासून तापमानाचा पारा वाढला असून वाढत्या उष्णतेमुळे जळगावकर होरपळला आहे. दरम्यान शुक्रवार ४३.९ अंशावर असलेले जळगावचे तापमान घसरून शनिवारी ४२.८ अंशावर आले. आजपासून आगामी काही दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आजपासून आगामी काही दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे.