---Advertisement---

Jalgaon News : सर्वसामान्य जनतेचा विश्वास हेच कामाचे खरे प्रमाणपत्र, पालकमंत्री गुलाबराव पाटील

---Advertisement---

जिल्हा नियोजन समिती योजनांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव,

Jalgaon News : ‘कागदावर सही होणं हे केवळ तंत्र आहे, परंतु ती सही एखाद्याच्या जीवनात परिवर्तन घडवते, तोच सेवाभावाचा खरा मंत्र आहे. सर्वसामान्य जनतेचा विश्वास हेच आपल्या कामाचे खरे प्रमाणपत्र असल्याचे मनोगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. जिल्हा नियोजन समिती योजनांतर्गत निगडित उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १२ विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आला. या वेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले की, ‘आपल्याकडे आलेला माणूस हा आपलाच आहे, या भावनेने निर्णय घ्या, त्याच्या चेहन्यावर समाधानाचे हास्य फुलवण्याचा प्रयत्न करा, असे सांगत विभागातर्फे होत असलेला सत्कार ही आपल्या कार्याची पावती आहे. शाबासकीची थाप आहे. त्यांनी इतर उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांचाही उल्लेख करत त्यांचेही अभिनंदन केले. ‘आपण सगळेच एका ध्येयाने काम करत आहोत. शेतकरी सुखी व्हावा, सामान्य म ाणसाचे जीवन अधिक सुसह्य व्हावे” असेही त्यांनी नमूद केले.

या वेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, यावल वन्य जीव उपवनसंरक्षक जमीर शेख, जळगाव विभाग उपवनसंरक्षक प्रवीण ए, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे साहाय्यक आयुक्त योगेश पाटील, आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी या दोन्ही अधिकाऱ्यांचा राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले. या उल्लेखनीय यशाचा गौरव पालकमंत्र्यांनी केला. तसेच अन्य विभागांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचादेखील सत्कार करण्यात आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जि.प. महिला व बालविकास विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव, महावितरण कंपनी, शासकीय दंत महाविद्यालय, जि.प. लेखा व वित्त विभाग, लघुपाटबंधारे विभाग, जळगाव आणि यावल वनविभाग, अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास, सहआयुक्त, नगरपरिषद शाखा, वस्ती सुधारणा, महावितरण, मोफत विद्युत जोडणी योजना, जिल्हा क्रीडा अधिकारी क्रीडांगण विकास आदी उपस्थित होते.

जिल्हा उद्योग पुरस्कार महाराष्ट्र शासन, उद्योग संचालनालय व जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांच्यातर्फे देण्यात येणारा जिल्हा उद्योग पुरस्कार मे. आदिनाथ अॅग्रो इंडस्ट्रीज, पारोळाचे मालक चकोर दिलीप जैन यांना प्रदान करण्यात आला. उद्योगातर्फे शेतीसाठी लागणारे ऑरगॅनिक फर्टिलायझरचे उत्पादन असून पुरस्कारांतर्गत सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रुपये १० हजारांची रोख रक्कम देण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभाग निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, घटकाने सन २०२४-२५ या कालावधीत एकूण ४३७ गुन्हे नोंदवून एक कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारूबंदी अंतर्गत ६३ प्रस्ताव दाखल असून एका सराईत गुन्हेगारास कायद्यान्वये कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत एमआयडीसी, जळगाव येथे बनावट मद्यनिर्मिती प्रकरणी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री १०० दिवस कार्यक्रमांतर्गत जळगाव तालुक्यातील वराड, वाळकी, लमोजन, कुन्हाडदा व म्हसावद गावात हातभट्ट्यांवर कारवाईसह समूळ उच्चाटन करण्यात आले आहे. याद्वारे जिल्ह्यात शासकीय योजनांच्या पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणीस हातभार लावणाऱ्या विभागांना योग्य ते प्रोत्साहन देण्यात आले असून इतर विभागांसाठीही प्रेरणादायी पाऊल ठरले आहे. प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी केले. त्यात त्यांनी २०२४-२५ मध्ये जिल्हा नियोजन विभागाकडून करण्यात आलेल्या संपूर्ण कामाचा आढावा घेतला.

गौरवान्वित अधिकारी

साहाय्यक संशोधन अधिकारी विशाल जाधव, साहाय्यक संशोधन अधिकारी अपर्णा बावणे, उपलेखापाल हर्षल दांडेकर, सांख्यिकी साहाय्यक शोभा जाधव, जि.प. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय योजना प्रसिद्धी कार्यालय, अधीक्षक समाज कल्याण राजेंद्र कांबळे, वरिष्ठ निरीक्षक सुनील महाजन, तालुका समन्वयक चेतन चौधरी, ‘सुंदर माझी शाळा’ अभियानांतर्गत शासकीय आश्रमशाळा लालमाती (प्रथम) मनेष तडवी, राजेंद्र लवणे, आश्रमशाळा, वाघझिरा ता. यावल (द्वितीय क्रमांक) किशोर महाजन, सदाशिव पवार, अनुदानित आश्रमशाळा पिंपळे (प्रथम), उदय पाटील, पवनकुमार पाटील, अनुदानित आश्रमशाळा, लोहारा (द्वितीय), सुनील सपकाळे, विश्वास गायकवाड, आदिवासी मुलींचे वसतिगृह (प्रथम) अलका दाभाडे, जावेद तडवी. आदिवासी मुलांचे वसतिगृह (द्वितीय) वासुदेव बच्छे, संदीप पाटील, डिजिटल क्लासरूम योजनेअंतर्गत विशेष कार्य भैयासाहेब देशपांडे, शासकीय आश्रमशाळा (चांदसर), सह. प्रकल्प अधिकारी राजेंद्र लवणे, पवनकुमार पाटील, विनोद पडोळे, कनिष्ठ लिपिक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment