Crime News : अलीकडे महिलांवर होणार अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशात एका नराधमाने गावातील महिलेला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केला. त्याचे अश्लील फोटो काढून तो तब्बल पाच वर्षांपासून पीडित महिलेला ब्लॅकमेल करत होता. यादरम्यान त्याने पीडित महिलेकडून लाखो रुपये उकळले. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, गावातील जितेंद्र बैरागी याने पाच वर्षांपूर्वी फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केला. त्याचे काढलेले अश्लील फोटो आणि व्हिडिओ तो पीडितेला पाठवून पैसे मागत होता. असे करत त्याने पिडीतेकडून तब्बल दोन लाख रुपये उकळले. त्यानंतर पीडितेने पैसे देण्यास नकार दिला असता त्याने थेट तिच्या घराबाहेर अश्लील फोटो फेकले. तसेच तिच्या घरात येऊन वारंवार अश्लील फोटो फेकायचा. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, नागदा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या घराजवळ राहणार जितेंद्र बैरागी हा अनेक वर्षांपासून त्रास देत होता. पाच वर्षांपूर्वी जितेंद्र याने महिलेला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केला. त्याने त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ बनवले होते. तेव्हापासून तो पीडित महिलेला सतत ब्लॅकमेल करत असे आणि तिच्याकडून पैसे उकळत असे.
पैसे न दिल्याने टाकायचा अश्लील फोटो
जितेंद्रने ब्लॅकमेल करून पीडितेकडून सुमारे दोन लाख रुपये उकळले होते. महिलेच्या तक्रारीवरून, नागदा पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. पीडितेने सांगितले की, तो माझा पाच वर्षांपासून ब्लॅकमेल करत होता, जेव्हा मी त्याद्रला पैसे देत नसे तेव्हा तो माझ्या घराबाहेर येऊन माझे काही अश्लील फोटो फेकायचा. त्याने हे एकदा किंवा दोनदा नव्हे तर अनेक वेळा केले.
पोलिसांनी आरोपी जितेंद्रला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमधील ही घटना असून, या प्रकरणात पुढील तपास पोलीस करत आहेत.