India–Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती आहे. दरम्यान, एक खूप मोठी बातमी समोर आली. भारतीय लष्कराने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये लष्कराने पाकिस्तानी चौकी कशी उडवून दिली आहे हे दिसून येते. भारतीय सैन्याने ज्या चौक्या उडवल्या त्याच चौकीवरून पाकिस्तान ड्रोन उडवून भारतावर हल्ला करत होता.
भारतीय सैन्याने तीन ठिकाणांना केले लक्ष्य
भारतीय लष्कराने पाकिस्तानी ड्रोन जिथून येत होते, दहशतवादी ज्या जागेचा वापर लाँच पॅड म्हणून करत होते आणि पाकिस्तानी चौकीला लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने या जागेला लक्ष्य केले आहे आणि ते जमीनदोस्त केले आहे. या बातमीचा व्हिडिओ शेअर करून लष्करानेच ही माहिती दिली. काल रात्री लष्कराने पाकिस्तानवर हा हल्ला केला होता ज्यामध्ये पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड उडवून देण्यात आले होते.
श्रीनगरच्या आकाशात युद्धाजन्य परिस्थिती
माहितीनुसार, पाकिस्तानने श्रीनगरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. श्रीनगरच्या आकाशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे. यावेळी पाकिस्तानचे दोन लढाऊ विमान पाडण्यात आले.