Raver News : तालुक्यातील रसलपूर येथे पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत गोवंश कत्तलखाना उद्ध्वस्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून चौघांना ताब्यात घेतले, तर चौघे पोलीस येताच पळून गेले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे ७४० किलो गोवंश मांस आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त केली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील रसतपूर येथील कुरेशी मोहल्ल्यात सलीम उस्मान कुरेशी याच्या घरासमोर गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिस पथक तातडीने रसलपूरकडे धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, काही इसम सलीम कुरेशी यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत खाली बसून गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्री करत असत्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यापैकी चौघांना जागेवरच पकडले, तर उर्वरित चौघे पोलिसांना पाहून पळून गेले. यात वसीम कय्युम कुरेशी, शेख शकील शेख कलीम, सलीम उस्मान कुरेशी
आणि सादिक शेख नुरा यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे अंदाजे ७४० किलो गोवंश मांस आणि चार जनावरांची कातडी, १ हजार २०० रुपये किमतीच्या चार कुन्हाडी आणि ८०० रुपये किमतीचे चार सुरे जप्त केले. जप्त केलेल्या मांसाचे नमुने तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसमक्ष सील करून पंचनामा करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल सतीश सानप करीत आहेत.