weather update : जिल्ह्यात विविध ठिकाणी १३ ते १८ मे दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गत सप्ताहात वातावरण ढगाळ तसेच संमिश्र स्वरूपाचे होते. सद्यस्थितीत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून तुरळक व नगण्य स्वरूपात पाऊस झाला आहे.
मंगळवार १३ ते १५ मे दरम्यान जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही भागांत गडगडाटी वादळे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
१३ आणि १४ मे रोजी दुपारनंतर ढगाळ वातावरण राहणार असून, पावसाची शक्यता ३० ते ५० टक्क्यांपर्यंत आहे.
काही ठिकाणी वादळी वाऱ्यांची गती ३५ ते ४० कि. मी. प्रती तास राहण्याची शक्यता असून, विजांचा कडकडाट होऊन वीज पडण्याचा धोकादेखील आहे. या काळात आर्द्रता वाढून ६०-६५ टक्क्यांपर्यंत जाणार असून दमट वातावरण निर्माण होईल. १६ मे आणि १७ मे दरम्यान जिल्हा परिसरात दुपारी किंवा सायंकाळांतर वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
१८ ते १९ में दरम्यान तापमानात वाढ होऊन तापमान कमाल ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत उष्णता जाणवेल आणि वातावरण कोरडे राहील. वातावरणात आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण गडगडाटी ढगांचे निर्माण आणि समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांचा प्रभाव हे या पावसाचे प्रमुख कारण आहे. १८ मे नंतरदेखील हवामान अस्थिर राहणार असल्याचे संकेत वेलनेस वेदर फाउंडेशनचे हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिले आहेत.
weather update : जिल्ह्यात १३ ते १८ मे दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
Published On: मे 14, 2025 11:02 am

---Advertisement---
---Advertisement---