---Advertisement---

आला रे आला… वेळेआधीच मान्सून आला

---Advertisement---

भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी हवामानाबद्दल माहिती दिली आहे. २७ मे रोजी केरळात आगमन होणार आहे. नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात, अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भागात, निकोबार बेटांवर आणि अंदमान समुद्राच्या उत्तरेकडील भागात पुढे सरकत आहे. या काळात दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे.

मागील दोन दिवसांत निकोबार बेटांवर झालेल्या मध्यम ते मुसळधार पावसाचा हवाला देत हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय, या भागात आउटगोइंग लॉन्गवेव्ह रेडिएशन मध्येही घट नोंदवण्यात आली आहे. जी ढगाळ हवामान दर्शवते. आयएमडीने स्पष्ट केले, की या सर्व परिस्थिती प्रदेशात मान्सूनच्या प्रारंभासाठी अनुकूल निकष पूर्ण करतात. मागील १७ वर्षांचा रेकॉर्ड मोडला मान्सूनने अधिकृतपणे दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राचा काही भाग व्यापला असून पुढील २४ तासांत निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मान्सून २७ मेपर्यंत केरळ किनाऱ्यावर पोहोचणार असून मागील १७ वर्षात प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या चार दिवस आधी केरळमध्ये पोहोचेल. काही दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-कोमोरिन परिसर, संपूर्ण अंदमान-निकोबार बेटे आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात विस्तारेल.

वाटचालीवर लक्ष ठेवून

दरवर्षी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन ६ जून रोजी होते. यंदा अंदमानमध्ये मान्सून ८ ते १० दिवस आधी आला. केरळमध्ये लवकर नैऋत्य मान्सून वारे पोहोचतील. महाराष्ट्रात कधी आगमन होईल याचा अंदाज लवकरच वर्तवला जाईल. सध्या आम्ही मान्सूनच्या वाटचालीवर लक्ष ठेवून आहोत. एस. डी. सानप, शास्त्रज्ञ,
पुणे हवामानशास्त्र विभाग

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment