---Advertisement---

विषप्राशन केलं अन् आईसमोर दारातच सोडले प्राण, जळगावातील घटना

---Advertisement---

जळगाव : घरी जेवण झाल्यानंतर बाहेर जाऊन विष प्राशन करीत ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. विषप्राशन करून आल्यानंतर हा तरुण आईजवळ येऊन बसला व त्यानंतर त्याला उलट्या झाल्या अन् तो गतप्राण झाला. योगेश लीलाधर वाघोदे (३२, रा. आयोध्यानगर) असे मृत तरुणीचे नाव असून, त्याची पत्नी सहा महिन्यांपासून मुलासह माहेरी गेल्याचे समोर आले आहे मात्र, योगेश याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

जळगाव शहरातील आयोध्यानगरात योगेश हा तरुण आई, पत्नी व मुलासह वास्तव्याला होता. एका कंपनीत काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, त्याची पत्नी मुलासह सहा महिन्यांपासून माहेरी गेलेली आहे.

मंगळवारी योगेश याने आईसोबत जेवण केले व नंतर तो बाहेर गेला. काही वेळाने तो घरी आला व दारात बसलेल्या आईजवळ बसला. त्याला उलट्या होऊ लागल्याने आईने इतरांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. मात्र, योगेश याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्यास अटक

जळगाव : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या वसीम निसार शहा (३४, रा. तांबापुरा) याला एमआयडीसी पोलिसांनी सुरत येथून ताब्यात घेतले. त्याला जळगावात आणले असून त्याच्याविरुद्ध पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसीम हा वापी येथे गेल्यानंतर जळगावात इतरांशी संपर्क करीत राहिला व त्यातूनच तो जाळ्यात अडकला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ३ मे रोजी बेपत्ता झाली होती. याविषयी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. मुलीचा शोध घेत असताना तिला तांबापुरा परिसरातील तरुणाने पळविल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी पोलीस कर्मचारी इम्रान बेग यांना शोध घेण्याविषयी सूचना दिल्या. वसीम हा कोणाच्या संपर्कात होता, तो कोठे आहे व इतर तांत्रिक मुद्यांद्वारे तरुणाची माहिती मिळविली. तो अल्पवयीन मुलीसह वापी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बेग तेथे पोहचले. त्यानंतर तरुण व मुलगी सुरत येथे गेले, तेथून त्यांना ताब्यात घेतले. दोघांनाही बुधवारी जळगावात आणले. या प्रकरणात वसीमविरुद्ध पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment