---Advertisement---

कर्जाचा वाद; भाच्याने थेट मामाच्या डोक्यात घातला खाटेचा पाया

---Advertisement---

नंदुरबार : शेती कर्जाच्या वादातून भाच्याने थेट मामाच्या डोक्यात खाटेचा पाया घातला. ही घटना २९ एप्रिल रोजी दुधाळे गावात घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मामाचा उपचार घेत असताना बुधवारी मृत्यू झाला. सुभाष उदास गावित (४५) रा. दुधाळे असे मयताचे नाव आहे.

दुधाळे गावात भाच्याने मामाच्या डोक्यात खाटेचा पाया मारून जखमी केल्याची घटना २९ एप्रिल रोजी घडली होती. जखमी मामाचा उपचार घेत असताना बुधवारी मृत्यू झाला. सुभाष उदास गावित (४५) रा. दुधाळे असे मयताचे नाव आहे.

सुभाष गावित हे २९ एप्रिल रोजी रात्री आई सुगाबाई यांच्यासोबत शेती कर्जाच्या कारणातून चर्चा करत होते. यादरम्यान वाद झाला. या वादात त्यांचा भाचा सुरेंद्र पप्पू ठाकरे (१९) रा. दुधाळे हा मध्ये पडला, यातून त्याने सुभाष डोक्यात तुटलेल्या खाटेचा पाया दोन वेळा मारून जखमी केले.

---Advertisement---

भाचा सुरेंद्र ठाकरे याने केलेल्या मारहाणीत सुभाष यांच्या कान व डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना नंदुरबारातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ११ मे रोजी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणाहून गुजरात राज्यात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. परंतु १४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

गुजरात राज्यातून आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांनी पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी रेखा सुभाष गावित यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुरेंद्र पप्पू ठाकरे (१९) रा. दुधाळे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक वानखेडे करत आहेत.

दारू विक्री करून रक्कम हडपणाऱ्या नोकराविरोधात गुन्हा

नंदुरबार : खापर (ता. अक्कलकुवा) येथे वाईन शॉपमध्ये नोकराने दारू विक्री करून त्याची रक्कम बँकेत न भरता हडपल्याचा प्रकार घडला आहे. संशयिताविरोधात गुन्हा दाखल कआहे. खापर येथील बिअर अंड वाईन शॉप या दुकानात रोहित ऊर्फ महावीर सुदाम अहिरे (२४) हा कामाला आहे.

रोहित याने ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या काळात दुकानासाठी विविध एजन्सीकडून माल घेत विक्री केली होती. विक्री केलेल्या मद्याची रक्कम बँक खात्यात भरणा करणे अपेक्षित होते. परंतु संबंधिताने २ लाख ३ हजार ५६३ रुपयांची रक्कम हडप केली. याप्रकरणी दुकानमालक पूनम अनिल पाटील यांनी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहित ऊर्फ महावीर सुदाम अहिरे (२४) याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---