---Advertisement---

दहावीत मिळविले ३५ टक्के; गावकऱ्यांनी मिरवणूक काढत केला सत्कार

---Advertisement---

पंढरपूर : मुलांच्या शालेय जीवनात दहावीची परीक्षा महत्वाची असते. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. यात राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. यात शंभर टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी आपण पहिले असतील. यासोबतच एखाद्या विषयात शंभर पैकीं शंभर गुण मिळविणारे देखील विद्यार्थ्यांबद्दल आपण ऐकले असेल. दहावीच्या परीक्षेतील गुणांमुळे भविष्यातील स्वप्न रंगविले जातात. चांगले गुण मिळालेकी विद्यार्थ्याला ज्या कोर्सला प्रवेश घ्यायचा असतो, त्या कोर्सला प्रवेश मिळवितांना त्यांची होणारी दमछाक कमी होते. यातच पंढरपूर तालुक्यातील एका विद्यार्थाने एक वेगळाच विक्रम केला आहे. त्याच्या या कामगिरीचे ग्रामस्थांकडून कौतूक केले जात आहे.

पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे गावातील विशाल सलगर हा विद्यार्थी दहावीत आहे. त्याने दहावीची परीक्षा दिली होती. त्याचा दहावीचा निकाल हाती येताच सर्वांना सुखद धक्का मिळाला. तो उत्तीर्ण झाला आहे. त्याने सर्वच विषयांत 35 टक्के मार्क प्राप्त केले आहेत.

विशाल याने सर्वच विषयांमध्ये 35 गुण मिळवत दहावीत 35 टक्के मार्क मिळवत नवा रेकॉर्ड केला आहे. त्याच्या या नवीन रेकॉर्डने सर्वंच अश्चर्य चकीत झाले. विशालने दहावीला ३५ टक्के गुण प्राप्त केल्याने गावकरी त्याचे अभिनंदन करत आहेत. गावकऱ्यांना त्याचे विशेष कौतुक वाटत आहे. गावकरी एवढ्यावरच न थांबता त्याची गावातून मिरवणूक काढण्याचे ठरविले. भटुंबरे ग्रामस्थांनी विशाल याला डोक्यावर घेत मिरवणूक काढली. यावेळी त्याचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार देखील करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना विशाल याने आता 35 टक्के गुण मिळवत महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी चढली आहे.यापुढे चांगले मार्क मिळविण्याचे आश्वासन दिले आहे

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment