जळगाव : राज्यात महिलांवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच जळगावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका २० वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात सनी प्रमोद उमक (२४, रा. हरिविठ्ठल नगर) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्याद तरुणी ही एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला आहे. दरम्यान, सनी प्रमोद उमक (२४, रा. हरिविठ्ठल नगर) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात सनी प्रमोद उमक (२४, रा. हरिविठ्ठल नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहनात डांबून तरुणीवर अत्याचार
नंदुरबार : नंदुरबार जिल्हयातदेखील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका २० वर्षीय तरुणीला वाहनात डांबून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना धडगाव तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या नराधमासह संगनमत करणाऱ्या १२ जणांविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडगाव तालुक्यातील २० वर्षीय तरुणीला संशयीत १२ जणांनी संगनमत करीत वाहनात कोंबले. त्यानंतर तिच्यावर एकाने जबरदस्तीने अत्याचार केला. ही घटना धडगाव तालुक्यातील एका गावी घडली. याबाबत पीडित तरुणीने धडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार १२ जणांविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.
साडेसहा वर्षीय बालिकेवर अत्याचार
चाळीसगाव : शहरातील एका भागातील साडेसहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अखिलेश चंद्रकांत तिवारी याला शुक्रवारी रात्री अटक केली. आरोपी तिवारी याने पीडित बालिकेला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी बोलावले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. तसेच कोणास माहिती दिली. तर जिवे मारण्याची धमकीही दिली. पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.