जळगाव : भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ जळगाव शहरात आज मंगळवारी (२० मे) रोजी समस्त जळगावकर महिला, माता व भगिणींकडून ‘सिंदूर यात्रा’ काढण्यात येणार आहे. यात्रेची सुरुवात सायंकाळी ०५:०० वाजता ब्राह्मण महासभा, बळीराम पेठ येथून, तर समारोप प्रकाश मेडिकल-सुभाष चौक-मार्गे झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक बेंडाळे चौक येथे होईल. तरी जळगाव शहरातील सर्व माता भगिणी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, माजी महापौर सीमा भोळे, दीपक सूर्यवंशी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष केतकी पाटील, रेखा वर्मा, भारती सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर या ‘सिंदूर’ यात्रेत सहभागी होणार आहेत.
‘ऑपरेशन सिंदुर’ मोहिमेअंतर्गत सशस्त्र दलातील सैनिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले. तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठिकाणी हल्ले करून नुकसान केले आहे. भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्ण कार्याबद्दल व त्यांच्या सन्मानार्थ ‘सिंदूर’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जळगाव शहरातील सर्व माता भगिणी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. तसेच महिला, माता-भगिणींनी कपाळावर मोठा “कुंकू (सिंदुर), हिरव्या बांगड्या, लाल साडी किंवा पोशाख” परिधान करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंत्री गिरीश महाजन होणार सहभागी