Jalgaon News : शहरातील समतानगर राहणाऱ्या एका 49 वर्षीय व्यक्तीने राहता घरात मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी 22 मे रोजी सकाळी 6 वाजता समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात सकाळी 10 वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ईश्वर सुखदेव वाघ (वय-49, रा.समता नगर, जळगाव) कसे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार ईश्वर सुखदेव वाघ वय-49, हे आपल्या पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत वास्तव्याला होते. हातमजुरी करून ते आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी 21 मे रोजी रात्री 11 वाजता ते जेवण करून मागच्या खोलीत निघून गेले. मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी 22 मे रोजी सकाळी 6 वाजता समोर आला.
नातेवाईकांनी त्याला खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. यासंदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी संगीता आणि मुलगा रणजीत असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी साळुंखे करीत आहे.