---Advertisement---

जळकेतील बोधरे नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरू, केशवस्मृती प्रतिष्ठानच्या समग्र कृषी ग्रामीण विकास प्रकल्पाचा पुढाकार

by team

---Advertisement---

केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समग्र कृषी ग्रामीण विकास प्रकल्पाच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने बोधरे नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. या उपक्रमासाठी प्रतिष्ठानकडून गावाला गाळ काढण्यासाठी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले असून, ग्रामस्थांकडून डिझेलचा सहभाग घेण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानकडून २०० तासांसाठी पोकलैंड यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. बोधरे नाल्यातील गाळ काढून जलस्रोत स्वच्छ व प्रवाही करण्याचा उद्देश आहे. या कामाची पाहणी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर यांनी केली. त्यांच्यासोबत केशवस्मृती प्रतिष्ठानचे संचालक राहुल पवार, जलनायक प्रकल्पप्रमुख शिवाजीराव भोईटे, प्रकल्पप्रमुख अनिल भोकरे, रोटरीचे अध्यक्ष किशोर सूर्यवंशी, गिरीश कुलकर्णी, मोहन कुलकर्णी उपस्थित होते.

ग्रामस्थांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर पाहुण्यांनी गाळ काढणीच्या कामाचे प्रत्यक्ष स्थळभेट दिली. या वेळी डॉ. भरत अमळकर यांनी प्रतिष्ठानच्या कामाची माहिती देत ग्रामस्थांच्या सहकार्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली. प्रकल्पप्रमुख अनिल भोकरे यांनी ग्रामस्थांना उद्योजकता विकासाबाबत मार्गदर्शन केले. शिवाजीराव भोईटे यांनी यापूर्वी केलेल्या गाळ काढणीच्या कार्याच्या आठवणीला उजाळा दिला.

त्यानंतर जळकेकर महाराज यांनी गावातील कामांबाबत माहिती देत गावातील शाळेला जर केशवस्मृती प्रतिष्ठानची जोड मिळाली तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही, अशी मागणी डॉ. अमळकर यांच्याकडे केली. गावामध्ये सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या ठिकाणी बांबूची रोपे रोटरी क्लबतर्फे देण्यात येणार आहेत, अशी माहिती गिरीश कुलकर्णी यांनी दिली हा उपक्रम गावाच्या पाणीप्रश्नावर उपाय शोधण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे मान्यवरांनी नमूद केले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment