---Advertisement---

ग्रामस्थांच्या आंदोलनात्मक भूमिकेनंतर तापी नदीपात्रातील वाळूचा वापर, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल; ठेकेदाराला तंबी

---Advertisement---

गावानजीक अमरावती नदीपात्रातील पुलाच्या कामावर स्थानिक नदी-नाल्यांतून अवैध वाहतूकदारांकडून वाळू टाकून ठेकेदार ठेकेदार काम करीत असल्याने मालपूरकरांनी आंदोलनात्मक भूमिका जाहीर केली. त्यासंदर्भात ‘तरुण भारत’ ने २१ मे रोजी अंकात अमरावती नदीवरील पुलासाठी चक्क मातीमिश्रित वाळूचा वापर या शीर्षकाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला. ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरत तंबी देण्यात आली.

आता तापी नदीपात्रातील वाळूचा वापर केला जात आहे. मालपूर-रामीदरम्यान रस्त्यावरील अमरावती नदीपात्रात सध्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. सुमारे १० कोटींतून अद्ययावत पूल तयार होणार आहे. कामावर स्थानिक नदी-नात्यांतून अवैध वाहतूकदारांकडून मातीमिश्रित वाळूचा वापर ठेकेदाराकडून केला जात होता. यामुळे कामाच्या दर्जावर मालपूरकरांसह परिसरातील ग्रामस्थांनी शंका उपस्थित केली.

अमरावती मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यावर या पुलाला बाधा पोहोचून पहिल्याच पुरात पुलाला धोका निर्माण होईल, अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत होती. यासाठी तापी नदीपात्रातील वाळूचा वापर करावा, अशीही मागणी ग्रामस्थांची होती. याची दखल न घेतल्यास पुलाचे काम बंद पाडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. याबाबतचे वृत्त २१ मे रोजी ‘तरुण भारत’ मधून प्रसारित झाले होते. वृत्त प्रसिद्ध होताच, सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला.

कनिष्ठ अभियंता शुभम राजपूत यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी जात मातीमिश्रित वाळूऐवजी नजीकच्या तापी नदीपात्रातील स्वच्छ वाळूचा वापर करण्याची तंबी ठेकेदाराला दिली. जोपर्यंत तापी नदीपात्रातील वाळू आली नाही, तोपर्यंत कामबंद केले. आता तापी नदीपात्राच्या वाळूचा वापर होत असल्याने पुलाच्या कामाच्या दर्जात सुधारणा झात्याने मालपूरकरांनी समाधान व्यक्त करीत ‘तरुण भारत’चे अभिनंदन करीत कौतुकही केले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment