जळगाव : विद्यार्थ्यांची सुरक्षितेसाठी शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी हजेरीसंदर्भात नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत. यानुसार विद्यार्थ्यांची सकाळ, दुपार व संध्याकाळी अशी तीन वेळा हजेरी घेण्यात येणार आहे. विद्यार्थी गैरहजर असल्यास पालकांना ‘एसएमएस’द्वारे माहिती देण्यात येईल.
शाळेत सीसीटीव्ही लावणे बांधकारक असणार आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे वर्गाचे दरवाजे, कॉरिडॉर, प्रवेशद्वार, मैदाने तसेच स्वच्छतागृहांबाहेर सीसीटीव्ही लावणे बंधनकारक असणार आहे. या सीसीटीव्ही फुटेजचा मागील एक महिन्याचा व्हिडिओ बॅकअप ठेवणे आवश्यक करण्यात आले आहे. शिक्षक व शिक्षकतेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणूकी करताना पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास सेवा तत्काळ समाप्त करणे, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रत्येक स्वच्छतागृहाजवळ परिचर, पाणी, प्रकाश आणि आपत्कालीन घंटा उपलब्ध असावी, असे नमूद कारण्यातआले आहे .

शाळेत तीन वेळा हजेरी घेण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. जर विद्यार्थी अनुपस्थित असल्यास पालकांना लगेच कळविले जाणार आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार माजी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीच्या शिफारसींनुसार सकाळी, दुपारी व संध्याकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांना दिवसातून तीन वेळा हजेरी घेण्याबाबत निर्देश दिले असून येत्या वर्षापासून सर्व शाळांमध्ये त्याबाबतची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे पालकांना आपला पाल्य शाळेत आला नाही याबाबत संदेश पाठविला जाणार असल्यामुळे निश्चितच पटसंख्येत वाढ होणार आहे. असल्याचे मत जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याआधी पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक शाळांमध्ये वर्गाचे दरवाजे, कॉरिडॉर, प्रवेशद्वार, मैदाने व स्वच्छतागृहाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. एका महिन्याचा व्हिडीओ बॅकअप ठेवण्याच्या सूचनादेखील या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी गैरहजर असल्यास त्वरित पालकांना मेसेज विद्यार्थी अनुपस्थित असल्यास पालकांना त्वरित ‘एसएमएस’द्वारे माहिती दिली जाईल, अशाप्रकारे दिवसातून तीन वेळा हजेरी घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेला दांडी मारण्याच्या प्रकाराला पूर्णतः आळा बसेल. मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नेमणे, शाळेच्या भिंतींवर सुरक्षेविषयी माहिती देणारे फलक, चित्रे डिजिटल बोर्ड लावावेत, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षिततेची हमी मिळणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या असून यामुळे विद्यार्थी शाळेत सुरक्षित वातावरणात राहणार आहेत.