---Advertisement---

महाबीजच्या कापूस, मका बियाण्यांसाठी ‘साथी’ पोर्टल, क्यूआर कोडव्दारे खरीप हंगामात अनुदानीत बियाणे पारदर्शकतेला प्राधान्य

---Advertisement---

खरीप हंगामांतर्गत शेतकऱ्यांची बनावट बियाण्याव्दारे फसगत होऊन आर्थिक नुकसान होते. ही फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘साथी’ पोर्टल प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. बियाण्यांसाठी क्यूआर कोडव्दारे महाबीजमार्फत खरीप हंगामात कापूस, मका बियाण्यांसाठी ‘साथी’ प्रणालीच्या क्यूआर कोडच्या माध्यमातून प्रमाणित बियाणे पुरवठा करणार आहे.

या क्यूआर कोडसह दर्जेदार वाणांच्या माहितीसाठी तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे अनुदानित दरात उपलब्ध होणार आहे.
खरीप हंगामांतर्गत महाबीजचे कापूस आणि मका वाणाचे प्रमाणित बियाणे हे साथी पोर्टल मधून नोंदणी केलेले आहे. बियाण्याच्या पिशवीवर ‘साथी’ पोर्टलचा क्यूआरकोड आहे.

क्यूआरकोड स्कॅन केल्यानंतर स्त्रोत, बियाणे उत्पादन व प्रक्रिया, तपासणी प्रयोगशाळेचे अहवाल आदी सर्व माहिती मिळणार आहे. यातून बियाणे शुद्धतेची खात्री शेतकऱ्यांना मिळणार आहे. खरीप २०२५ हंगामात विद्यापीठांद्वारे नव्याने संशोधन केलेल्या वाणांसह शेतकऱ्याना यात समावेश राहणार आहे.

राज्य बियाणे महामंडळ केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांव्दारे राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत विविध पिकातील नवीन वाणांचे बियाणे अनुदानित दरात उपलब्ध होणार आहे. यात तूर रु. १३० प्रति किलो, मूग दर रु. १४० प्रति किलो, उडीद दर रु. १३५, धान (भात) वाणांनुसार रु. ३० ते ४० प्रति किलो, संकरीत बाजरा दर रु १५० प्रति किलो, सुधारित बाजरा दर रु ७० प्रति किलो, नाचणी दर रु. १०० प्रति किलो या अनुदानित दरात उपलब्ध होणार आहे.

ग्राम बीजोत्पादन योजना आता राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा बियाणे घटक म्हणून असून यातून शेतकऱ्यांना नवीन वाणांचे बियाणे अनुदानित दराने उपलब्ध होणार आहे. गतवर्षी या योजनेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १ एकर क्षेत्र मर्यादित बियाणे मिळत होते. परंतु यावर्षी अडीच एकर पर्यंत मर्यादा वाढविण्यात आली आहे.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सोयाबीन वाणासाठी सुवर्णा सोया, फुले दुर्वा, पी.डी.के.व्ही अंबा, एन.आर.सी-१३०, फुले किमया, १४६०, ७२५ या वाणाचे बियाणे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध आहे. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावा लागेल.

  • शासन स्तरावरून महाबीज बियाणे उत्पादक कंपनीमार्फत मका आणि कपाशी वाणासाठी ‘साथी’ पोर्टल क्यूआर कोडव्दारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून बियाण्याचे स्त्रोत, उत्पादनाचा कालावधी, शुद्धता आदी घटक आदी शेवटच्या घटकापर्यंत शोध घेणे शक्य होईल. या माध्यमातून जातीवंत बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होऊन फसवणूक टाळणे शक्य होणार आहे.
    पद्मनाभ म्हस्के, सहायक जिल्हा कृषी अधिकारी, जळगाव
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment