---Advertisement---

Encounter : उद्योगपती कुटुंबीय परदेशी, इकडे चोरट्यांनी मारला घरावर डल्ला, अखेर मुख्य सूत्रधाराचा पोलिसांकडून एन्काऊंटर

---Advertisement---

Encounter : छत्रपती संभाजीनगरमधील बजाज नगर मध्ये राहणाऱ्या एका बड्या उद्योजकाच्या घरी दरोडा घालणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांच्या गुन्हे शाखेने चकमकीत ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी दि. २६ मे च्या मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांकडून अमोल खोतकर या संशयित गुन्हेगाराचा एन्काऊंटर करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी भागात अमोल खोतकर हा लपलेला असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सह-पोलीस निरीक्षक पथकासह त्याला अटक करण्यासाठी गेले.

पोलिसांचे पथक कोल्हाटी येथे पोहोचले त्यावेळी अमोल खोतकर गाडीतून पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याची पोलिसांवर नजर पडताच त्याने जवळ असलेली गाडी पोलिसांच्या अंगावर चढवली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. अमोल खोतकर एवढ्यावरच थांबला नसून त्याने जवळ असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून पोलिसांवर गोळीबार सुरु केला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अमोल खोतकर मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान पोलीस सध्या एन्काऊंटर संबंधी कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत. हा एन्काऊंटर कसा झाला, याबद्दलची कोणतीही तपशीलवार माहिती द्यायला पोलिसांनी नकार दिलेला आहे.

नेमकी घटना काय ?

छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी पहाटे दरोडा पडला होता. त्यावेळी संतोष लड्डा हे आपल्या कुटुंबीयांसह परदेशात गेले होते. संतोष लड्डा यांचा विश्वासू केअरटेकर संजय झळके हा बंगल्यात होता. दरोडेखोरांच्या टोळीने त्याच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून या दरोड्यात लड्डा यांच्या घरातील सहा ते सात किलो सोने आणि ३२ ते ३५ किलो चांदीची लुट करून नेली.

पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरु केल्यानंतर ५ आरोपींना अटक केली होती. सहावा आरोपी अमोल खोतकर त्याच्याकडेच चोरीचा मुद्देमाल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले मात्र, अमोल खोतकर पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला.

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग असल्याची शंका बोलून दाखवली होती. त्यानंतर आता अमोल खोतकरचा एन्काऊंटर झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता याबाबत पोलिसांकडून काय माहिती दिली जाणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment