सांबा सेक्टरमधील चौकीचे नाव ‘सिंदूर’ ठेवावे, दोन चौक्यांना हुतात्मा जवानांचे नाव देण्याचा बीएसएफचा प्रस्ताव

---Advertisement---

 

बीएसएफच्या चौक्यांवर पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात आणि गोळीबारात बीएसएफचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज, कॉन्स्टेबल दीपक कुमार आणि भारतीय लष्कराचे नाईक सुनील कुमार है जवान हुतात्मा झाले. या तीन चौक्यांपैकी दोन चौक्यांना हुतात्मा झालेल्या जवानांचे नाव आणि एका पोस्टला ‘सिंदूर’ हे नाव देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्पाची माहिती जम्मू येथील बीएसएफचे महानिरीक्षक शशांक आनंद यांनी सोमवारी सांगितले.

पाकिस्तानसोबत झालेल्या संघषविळी बीएसएफच्या महिला कर्मचाऱ्यांनी निकरीचा लढा दिला. असिस्टंट कमांडंट नेहा भंडारी यांनी एका पोस्टचे नेतृत्व केले. कॉन्स्टेबल मनजीत कौर, कॉन्स्टेबल मलकीत कौर, कॉन्स्टेबल ज्योती, कॉन्स्टेबल संपा आणि कॉन्स्टेबल स्वप्ना आणि इतरांनी हे पोस्ट सांभाळली होती अशी माहिती आनंद यांनी पत्रपरिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले, आम्ही ७० हून अधिक पाकिस्तानी चौक्या आणि लाँच पेंडना लक्ष्य केले आणि त्यांचे नुकसान केले. यावेळी आमच्या बीएसएफ महिला जवानांनी सर्व विशेष शस्त्र प्रणालींमधून गोळीबार केला. बीएसएफच्या एका महिला अधिकाऱ्याने सीमा चौकीचे नेतृत्व देखील केले. मला आशा आहे की यामुळे देशातील महिलांना बीएसएफमध्ये सामील होण्यास प्रोत्साहन मिळेल.

व्याप्त काश्मिरात परतले दहशतवादी

शशांक आनंद म्हणाले, पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या दोन चौक्यांना दोन हुतात्मा जवानांचे नाव द्यायचे आहे. पाकिस्तानी दहशतवादी व्याप्त काश्मिरात त्यांच्या लॉचिंग पॅड आणि कॅम्पमध्ये परतत आल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत ते नियंत्रण रेषेवरूनही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतील. त्यांना रोखण्यासाठी बीएसएफ सज्ज आहे.

प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानी सैनिकचौक्या सोडून पळाले

९ मे रोजी पाकिस्तानने आमच्या अनेक चौक्यांना लक्ष्प करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी अनेक गावांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीएसएफ जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. बीएसएफने पाकिस्तानी दहशतवाद्यांचे लॉचपॅड उद्ध्वस्त केले. गोळीबारादरम्यान, पाकिस्तानी सैनिक त्यांच्या चौक्या सोडून पळून जाताना दिसले. पाकिस्तानने बारमेर, जैसलमेर, बिकानेर आणि श्रीगंगानगर जिल्ह्यात ४१३ ड्रोन हल्ले केले परंतु ते सर्व भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---