---Advertisement---

सुनेला संपव अन् दुसरं लग्न कर; सासूचा मुलाकडे आग्रह, शेवटी तेच घडलं

---Advertisement---

धुळे : प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पत्नीला संपविण्यासाठी सैन्य दलातील पतीने जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकांची मदत घेत पेस्टिसाइडचे इंजेक्शन देत पत्नीला ठार मारले, यासाठी मांत्रिकाला प्रेयसीकडून ५० हजार तर पतीने पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धुळे शहरातील वलवाडीतील साईशिल्प वक्रतुंड विहारमध्ये राहणाऱ्या सैन्यात क्लर्क असलेल्या कपिल बागूल याने आपले प्रेमसंबंध माहिती पडले म्हणून पत्नी पुजा (३८) हिचा पेस्टिसाइडचे इंजेक्शन देऊन काटा काढल्याची घटना (३० मे) रोजी घडली होती. या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेतील दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत होती.

याप्रकरणी पोलिसांनी खूनातील मुख्य आरोपी पती कपिलसह आई, वडील, बहीण आणि प्रेयसी अशा चौघांना अटक केली होती. शुक्रवारी एका विधीसंघर्षित मुलासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

तांत्रिकाच्या घरी प्लॅन

लग्नात अडथडा ठरणाऱ्या पुजाला संपविण्यासाठी कपिल आणि त्याची आईने जादुटोणा करून पुजाच्या काटा काढण्याचा प्लॅन केला, त्यासाठी दोघे भूषण बापू काळे या बोगस तांत्रिकाच्या घरी गेले होते. त्यावेळी पुजाला कायमचे संपविण्यासाठी तांत्रिकाच्या घरी प्लॅन तयार करण्यात आला होता. यात प्रेयसी प्रज्ञा देखील सहभागी होती.

सुनेला संपव, सासूचा मुलाकडे आग्रह


पूजा आणि सासू विजया यांच्या नेहमी वाद होत होते. त्यामुळे बागुल कुटूंबियांना पुजा नकोशी झाली होती. तर मुलाचे आवडीप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर दुसरे लग्न व्हावे, यासाठी सासु पुजाला कायमचे संपविण्यासाठी मुलाकडे आग्रही होती. यासाठी दोघांनी तांत्रिकाचा सल्ला घेतला होता.

पती व प्रेयसीकडून देण्यात आली रक्कम


पुजाला मारण्यासाठी भुषण काळेसह पाच जणांनी मदत केली. यासाठी प्रज्ञाने ५० हजार मांत्रिक भूषणच्या अकाउंटवर फोन पे ने पाठविले. तर कपिलने १ लाख रोखीने या सर्वांना दिले होते. संपूर्ण मदत करण्याकरिता पाच लाखांची रक्कम ठरली होती. २९ तारखेला या सर्वांनी कपिलला पेस्टिसाइड इंजेक्शन घरी आणून दिले. त्यानंतर सर्वजण पुजाच्या मृत्यू होईपर्यंत वाट पाहत होते. यावेळी पूजाची सासू विजया बागूल हिने उपस्थितांना चहाचा आग्रह केला होता.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment