भोरटेक शिवारात अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणारे वाहन वनविभागाकडून जप्त

---Advertisement---

 

तालुक्यातील भोरटेक शिवारात अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणारे वाहन वनविभागाकडून जप्त करण्यात आले. वाहनासह अंदाजे १ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भोरटेक शिवारात अवैध वृक्षतोड सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून वनविभागाने गस्त घालत एक पिकअप वाहन ताब्यात घेत कारवाई केली. वनपरिक्षेत्र अधिकारी, गस्ती पथक यावल यांना भोरटेक शिवारात अवैध वृक्षतोडीबाबत तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रार अर्जानुसार यावल आगार रक्षकासह गस्ती पथक यावल भुसावळ रस्त्याने गस्त करीत असताना संशयित पिकअप क्रमांक ३१५७ वाहनांची तपासणी केली.

तपासणीत वाहनात निंब, बाभूळ, जळाऊ लाकडे मिळून आली. यावरून वाहन चालक ज्ञानेश्वर कोळी यांना सदर मालाच्या वाहतूक पासबद्दल विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना मिळून आला नाही. त्यामुळे वाहनासह जळाऊ लाकूड जप्त करण्यात आले. गुन्हा क्रमांक ०७/२०२५ ता. ९/६/२०२५ अन्वये नोंदविण्यात आला.

ही कारवाई उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव, साहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्प) यावल, वनपरिक्षेत्र अधिकारी, गस्ती पथक यावल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यवाही दरम्यान आगार रक्षक यावल बी. बी. गायकवाड, वनरक्षक गस्ती पथक आय. बी. चव्हाण तसेच पोलीस (कॉ.) एस. आर. तडवी, वाहन चालक योगिराज तेली उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---