---Advertisement---

धक्कादायक ! पत्नीच्या अंगावर कार घातली अन् फरफटत नेले, भडगावातील घटना

---Advertisement---

जळगाव : भडगाव शहरात कौटुंबिक वादातून पत्नीला चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याघटनेत विवाहिता जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात फरार पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रानुसार, तृप्ती रेवण पवार (वय ३२) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. भडगाव शहरातील पेठ भागातच तिचे माहेर आहे. पती रेवण प्रमोद पवार (पाचोरा) याने साळी प्रियदर्शनी पाटील यांना मारहाण केली. तृप्ती हिला सासरी येऊ नको, असे बजावत मुलगी गार्गीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, तृप्ती हिची आई व बहीण हे बालिका गार्गी हिला घेण्यासाठी वाहनाजवळ आली असता रेवण याने पत्नीच्या अंगावर कार घातली. तिला फरफटत नेले. यात ती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर भडगाव येथे उपचार सुरु आहेत.

तृप्ती ही कारच्या समोरच्या बोनटमध्ये सापडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. पती गाडी घेऊन फरार झाला असून त्याच्याविरुध्द भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के यांनी दिली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment